मुख्य सामग्रीवर वगळा

वसतीगृह चळवळीचे प्रणेते...राजर्षी शाहू महाराज...


वसतीगृह चळवळीचे प्रणेते...राजर्षी शाहू महाराज...
आज राज्यात व देशात शासनाकडून वसतीगृहे उभारण्यात आली आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासलेल्या जातींच्या मुलांसाठी ही वसतीगृहे कार्यरत आहेत.  लोकशाही व्यवस्थेत मिळालेल्या मिळालेल्या हक्क आणि अधिकारानुसार आज प्रत्येक जण शिक्षण घेत आहे. परंतु 20 व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत शिक्षण ही ठराविक लोकांची मक्तेदारी होती. शिक्षणाची कवाडे बहुजन समाजाला खुली व्हावीत यासाठी आयुष्यभर छत्रपती शाहू महाराजांनी प्रयत्न केले. तत्कालीन परिस्थितीत बहुजन समाजाच्या मुलांची शिक्षणासाठी परवड होत असे. ग्रामीण भागात शिक्षणाची सोय नसल्याने बहुजन समाजातील मुलांना शिक्षणासाठी शहरात यावे लागत असे. परंतु मोठ्या शहरात राहण्याची, जेवणाची त्यांची व्यवस्था होत नव्हती. ही बाब ध्यानात आल्यावर छत्रपती शाहू महाराजांनी 20 व्या शतकाच्या प्रारंभी म्हणजे 18 एप्रिल 1901 रोजी कोल्हापूर येथे व्हिक्टोरिया मराठा बोर्डींग स्कूल या कोल्हापूरातील पहिल्या वसतीगृहाची स्थापना केली. या बोर्डींग स्कूलच्या नावात मराठा असा उल्लेख असला तरी वसतिगृहात मराठ्यांप्रमाणे मुसलमान, शिंपी, कोळी, माळी, गवळी या समाजातील मुलांना देखील वसतीगृहात राहण्याची सोय होती. शाहू महाराजांनी 1901 साली जैन बोर्डींगची स्थापना केली. याचबरोबरीने शाहू महाराजांनी लिंगायत, मुस्लीम, अस्पृश्य, सोनार, शिंपी, पांचाळ, गौड सारस्वत, इंडियन ख्रिश्चन, चां.का. प्रभू, वैश्य, ढोर-चांभार, सुतार, नाभिक, सोमवंशीय आर्यक्षत्रिय, कोष्टी अशा विविध जाती धर्माची सुमारे 20 वसतीगृहे सुरु केली. शाहू महाराज वसतीगृहे स्थापन करत असताना वेगळी पद्धत अवलंबित असत. ज्या जातीचे वसतिगृह स्थापन करायचे आहे त्या जातीतील लोकांशी ते सातत्याने संपर्क करीत. आपल्या जातीतील मुलांच्या हितासाठी वसतिगृह आवश्यक आहे ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण करीत. त्यानंतर संबधित जातीमध्ये वसतीगृहाविषयी जाणीव जागृती होत असे. मग त्याच जातीतील एखादा पुढाऱ्याच्या पुढाकाराने वसतीगृहे स्थापन होत असत. शाहू महाराजांच्या या क्लुप्तीमुळे मागासवर्गीय जातीमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण होण्यास मदत झाली. शाहू महाराजांनी जातवार वसतीगृहे निर्माण केली. जातवार वसतीगृहे निर्माण करण्याचा शाहू महाराजांचा उद्देश वेगळा होता. प्रत्येक जातीतील मुलांनी शिक्षण घेतले तर ते विचारशील बनतील. मुले विचारशील बनल्यावर जातीयता व अस्पृश्यता ही वाईट आहे हे आपोआप त्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे जातीभेद व अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी ही मुले प्रयत्न करतील. असा शाहू महाराजांचा त्यामागील हेतू होता. शाहू महाराजांनी उभारलेल्या वसतीगृहांमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुले शहरासारख्या भागात जाऊन शिक्षण घेऊ लागली. स्वतः च्या पायावर उभी राहू लागली. शाहू महाराजांनी महाराष्ट्रात वसतीगृहाची चळवळ सुरु केली नसती तर अनेक बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहिली असती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, बहुजन समाजातील मुलांसाठी वसतीगृहाची चळवळ निर्माण करणाऱ्या शाहू महाराजांच्या कार्यास त्रिवार अभिवादन! 
संग्राम सतीश कासले, मालवण. 
(संदर्भ - राजर्षी शाहू छत्रपती जीवन व कार्य - डाँ. जयसिंगराव पवार)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.