सेवांगण उपक्रम समुह ग्रुप
काही दिवसांपूर्वी मी सेवांगण उपक्रम समुह ग्रुपशी जोडला गेलो. सेवांगण उपक्रम समूह या ग्रुपवरुन स्पर्धांचे निकाल बातमीसाठी उपलब्ध होतील हा माझा प्राथमिक हेतू होता. परंतु आज हा ग्रुप माझ्या ज्ञानात भर घालत आहे. त्याचबरोबरीने नवनवीन गोष्टी शिकायला लावत आहे. शालेय जीवनात मी बँ. नाथ पै सेवांगणच्या स्पर्धेत भाग घेतला होता. परंतु त्यावेळी मला सेवांगणच्या स्पर्धेत पारितोषिके मिळाले नव्हते. मात्र गेल्या काही दिवसात सेवांगण उपक्रम समूहातील दोन स्पर्धेत मी सहभागी झालो आणि त्यातील दोन स्पर्धेत मला पारितोषिके मिळाले. माझ्यासोबत बँ. नाथ पै सेवांगणच्या आँनलाईन स्पर्धेत अनेक जण सहभागी होत आहेत आणि पारितोषिके प्राप्त करीत आहेत. सेवांगण उपक्रम समूह हा ग्रुप लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींचा सर्वांचाच आवडता आहे. या ग्रुपच्या माध्यमातून लहान मुलांना छान छान कथा ऐकायला मिळतात. आता तर विज्ञानकथाही ऐकायला मिळणार आहेत. एकूणच कोरोना व लाँकडाऊन कालावधीतही लहान मुलांवर संस्कार करण्याचे काम, त्याबरोबरीने इतरांना कार्यप्रवण करण्याचे कार्य या ग्रुपच्या माध्यमातून केले जात आहे. ग्रुपमध्ये आँनलाईन पद्धतीने अनोख्या स्पर्धा होतात. या स्पर्धांचे पारितोषिके वितरण समारंभही याच ग्रुपवर अनोख्या पद्धतीने होते. त्यामुळे प्रत्यक्ष स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाप्रसंगीची उत्सुकता अनुभवता येते. या स्पर्धेत अनेक स्पर्धक उत्साहाने सहभागी होतात. एकप्रकारे प्रत्येकामध्ये जिंकण्याची जिद्द हा ग्रुप निर्माण करत आहे. या ग्रुपच्या माध्यमातून बँ. नाथ पै सेवांगण आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आणखी सुंदर उपक्रम राबवावेत जेणेकरून नव्या गोष्टी शिकता येतील. सेवांगणच्या आगामी उपक्रमांना माझ्या शुभेच्छा!
संग्राम कासले, मालवण

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा