काय रे काय आसा?.....
हा फँव्हेरट डायलाँग आहे माझा माजी सहकारी समतादूत आणि सध्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत समन्वय असणाऱ्या सचिन नाईक याचा. सचिन हा दोडामार्ग असायचा त्यावेळी त्याच्या मोबाईलला रेंज नसायची. त्यावेळी समतादूत प्रकल्पाची अपडेट जाणून घेण्यासाठी तो मोबाईल करायचा तेव्हा आवर्जून विचारायचा काय रे काय आसा? समतादूत प्रकल्पाच्या निमित्ताने माझी व सचिनची ओळख झाली. या काळात सचिनच्या बहुरंगी व्यक्तीमत्वाची ओळख झाली. सचिनचे डी.एड व बी.एड झाले आहे. त्यामुळे सचिनचे फलकलेखन उत्तम आहे. समतादूत प्रकल्पात आम्हाला मासिक अहवाल तयार करावा लागत असे. आमच्या सर्वांमध्ये सचिनचा मासिक अहवाल सर्वात सुंदर असायचा. त्यामुळे अनेकजण सचिनकडून मासिक अहवालाचे पहिले पान तयार करून घ्यायचे. सचिनने अनेक समतादूतांना अहवाल लेखनाचे पान तयार करून दिले आहे. परंतु हे काम असताना सचिन कंटाळायचा नाही. नेहमी दुसऱ्याला मदत करणे हा सचिनचा स्थायीभाव आहे. सचिन उत्तम वादक, गायक, निवेदक आहे. समतादूत प्रकल्पातील समतारथात सचिनने सुंदर वादन केले होते. सचिनची भारतीय संविधानाची प्रास्ताविकाही तोंडपाठ आहे. अनेक शाळांमध्ये त्याने भारतीय प्रास्ताविकेचे वाचन प्रभावीपणे केले आहे. कोणत्याही तालुक्यात समताप्रबोधन कार्यक्रम असू दे, सचिनला जर विनंती केली तर तो आवर्जून कार्यक्रमाला येऊन समताप्रबोधन करण्यात नेहमी मदत करायचा. सचिन जसा मिनमाळवू आहे तसाच त्याचा परिवार आहे. आम्ही समतादूत मुंबईवरून ट्रेनने उशिरा यायचो तेव्हा रात्री सचिनच्या बहिणीकडे राहयचो. त्यावेळी नाईक कुटुंबाने आम्हाला सहकार्य केले आहे. मुळात सचिनच्या घरी गेल्यावर आम्हाला आमच्याच घरी गेल्यासारखे वाटते. कारण सचिनच्या घरातील प्रत्येक सदस्य आमच्याशी आपुलकीने व प्रेमाने वागता. हे माझेच नाही तर सुजित, सगुण यांचेही मत असेल. सचिन सध्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत समन्वयक म्हणून चांगल्याप्रकारे काम करत आहे. वाढदिवसानिमित्त त्याला लाख लाख शुभेच्छा!
संग्राम कासले, मालवण

👌🏻 Happy Birthday Dadus..🎂
उत्तर द्याहटवा