फेसबुक फ्रेंड विक्रांत चव्हाण.........
सोशल माध्यमामुळे सर्व जग जवळ आले आहे. सोशल माध्यमाद्वारे आपण जगभरातील माणसांची संवाद साधू शकतो. फेसबुकच्या निमित्ताने माझी विक्रांत चव्हाण सर या बहुआयामी व्यक्तीमत्वाशी ओळख झाली. विक्रांत चव्हाण यांच्यासोबत माझी कधीही भेट झालेली नाही. तरीही फेसबुकच्या माध्यमातून ते मला दररोज भेटत असतात. विक्रांत चव्हाण हे मूळ देऊळवाडा मालवण येथील आहेत. सध्या ते नवमहाराष्ट्र हायस्कूल घाटकोपर येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षक हा अष्टपैलू असतो हे विधान विक्रांत चव्हाण यांच्या वेगवेगळ्या उपक्रमातून दिसून येईल. विक्रांत हे त्यांच्या शाळेशी निगडीत विविध उपक्रम फेसबुकवर मांडत असतात. काही समस्यांमुळे ज्या विद्यार्थ्यांना आपले शिक्षण सोडावे लागले पण रात्र शाळेच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले अशा विद्यार्थ्यांची ओळख विक्रांत चव्हाण यांच्या फेसबुक पेजमधून होत असते. मालवण आणि कोकणविषयी असणारे नितांत प्रेम त्यांच्या पोस्टमधून सातत्याने दिसते. त्यांचा घामोळा लेख सुंदर होता. मनीआँर्डरची पोस्टही जुन्या आठवणी जाग्या करणारी होती. देऊळवाडा परिसरात फेरफटका मारत असलेला व्हिडिओमधून त्यांचे मालवणविषयी असणारे नितांत प्रेम दिसून येते. फेसबुकवर होणाऱ्या अनेक चर्चांमध्ये ते सहभागी होतात प्रसंगी आपले मतही मांडतात. चांगल्या कार्याचे ते सातत्याने कौतुक करतात. दिपक कदम हा रात्रशाळेतील विद्यार्थी पार्ट टाईम जाँब करुन आपले शिक्षण पूर्ण करतो अशी पोस्ट टाकली होती. या पोस्टवरुन दिपक कदम या मेहनती विद्यार्थी विषयीचा अभिमान दिसून येत होता. मी विक्रांत चव्हाण यांच्या फारच थोड्या पोस्टचा आढावा घेतला. पण त्यांच्या प्रत्येक पोस्ट मधून काहीतरी नवीन शिकता येते. म्हणूनच विक्रांत चव्हाण हे फेसबुक फ्रेंड मार्गदर्शक वाटतात.
संग्राम कासले, मालवण

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा