वेल डन सचिन.......
काल सायंकाळी कोकण नाऊ चँनलच्या फेसबुक पेजवर कोकणातील उदयोन्मुख कलावंत सचिन वळंजू याची मुलाखत सुरु होती. या मुलाखतीमध्ये सचिनबद्दलच्या अनेक गोष्टी समजल्या. सचिनला मी पहिल्यांदा बांदा येथील युवा महोत्सवात पाहिले होते. देवगड काँलेजने सादर केलेल्या वुई द पीपल या एकांकिकेत त्याने अप्रतिम काम केले होते. त्यानंतर सचिन मला भेटला होता समतादूत प्रकल्पाच्या निमित्ताने मालवण एसकेपी काँलेज येथे. त्याने एक अप्रतिम अँक्ट सादर केला होता. पण याही पलीकडे मला एक वेगळा सचिन फेसबुकवरील मुलाखतीच्या निमित्ताने दिसून आला. सचिन अभिनेता आहेच पण उत्तम गायकही आहे. त्याने फेसबुक लाईव्हवर सादर केलेली गीते जबरदस्त होती. अण्णाभाऊ साठेंची छक्कड, भीमराव पांचाळेंची गजल, दोनच राजे इथे जन्मले, चांदण्याची काया ही गीते सचिनने स्वतःच्या अंदाजात सादर केली. एका तासाच्या मुलाखतीत सचिनने बालपणापासून घेतलेली मेहनत दिसली. नाटकातील पाठांतरच्या क्लुप्त्याही त्याने उलघडल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मेहनतीला पर्याय नसल्याचे त्याने सांगितले. सचिन विविध व्यावसायिक नाटकांमध्ये अभिनय करतो. स्टार प्रवाहवरील एक टप्पा आऊट या कार्यक्रमात त्याने विविध विषयावरील स्किट सादर केली. समाजप्रबोधनाचेही भान सचिनला आहे. म्हणून पथनाट्यही तो आवर्जून करतो. नाट्य, चित्रपट क्षेत्रात येणाऱ्या उदयोन्मुख कलाकारांनी सचिनची कोकण नाऊवरील मुलाखत अवश्य पहावी. मुलाखतीमधील अनेक गोष्टी त्यांना मार्गदर्शक ठरतील.
संग्राम कासले, मालवण

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा