मुख्य सामग्रीवर वगळा

पप्पू.....


पप्पू..... 
पप्पू माझा बीएडचा सहकारी. पप्पूचे मुळ नाव राजाराम पण तो सर्वत्र पप्पू याच नावाने प्रसिद्ध आहे. बीएडच्या पूर्ण वर्षात कोणताही तणाव न घेता बीएड योग्य पद्धतीने पूर्ण करणारा अवलिया कलाकार म्हणजे पप्पू. पप्पू कुडाळ हायस्कूलला शिक्षक म्हणून अध्यापनाचे कार्य करतो. पप्पू हा मित्रांमध्येच जास्त रमतो. किंबहुना त्याचा मित्रसाठा भरपूर आहे. अभ्यासाबरोबरच क्रिकेट हे पप्पूचे वेड. जिल्ह्यातील अनेक क्रिकेट सामने पाहण्यासाठी तो आवर्जुन उपस्थित असतो. बीएडला असताना सायंकाळी क्रिकेट खेळण्यासाठी तो मैदानावर आवर्जून उपस्थित असायचा. बीएडला असताना अनेक वेळा मैदानावर त्याने जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा आयोजन करण्याचा संकल्प केला होता. पप्पू हा जसा क्रिकेटवेडा आहे तसाच त्याला भटकंती करण्याचा छंद आहे. टु व्हिलर, फोर व्हीलरने तो जिल्ह्यात व जिल्ह्याच्या बाहेर भटकंती करत असतो. इतरांना मदत करणे हा पप्पूचा स्वभाव आहे. बीएडचा आमचा सहकारी रमेश भोये हा अपंग असल्याने त्याला पाठाला जाताना अडचणी येत होत्या. ही बाब पप्पूच्या लक्षात येताच पप्पू आपल्या दुचाकीने त्याला पाठ असलेल्या शाळेत पोहचवायचा. पप्पूचे कुटुंब मोठे आहे. कुटुंबात कोणतीही समस्या निर्माण झाली तर ती सोडवण्यासाठी पप्पू नेहमी पुढाकार घेतो. पप्पूचे आई, वडील, पत्नी किंबहुना सर्वच कुटुंबाकडे आपलेपणा आहे. या कुटुंबातील सदस्यांशी जे जोडले गेलेले आहेत त्यांना कधीच परकेपणा जाणवत नाही. आज पप्पूचा वाढदिवस आहे. नेहमीप्रमाणे मित्रपरिवारांच्या सानिध्यात पप्पूचा वाढदिवस दणक्यात साजरा होणार आहे. पप्पूला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! ( पप्पू बीएडचे दिवस खूप मिस करतोय यार पुन्हा एकदा तु, मी, भाल्या, सारे मित्र सायंकाळी देवगड येथील हाँटेल प्रपंचमध्ये जाऊन पँटीसचा आस्वाद घेऊया...भाल्याकडे आता फोर व्हिलर आहे त्यामुळे तुला पेट्रोल खर्चाची चिंता नसावी) - संग्राम कासले, मालवण

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.