मुख्य सामग्रीवर वगळा

मिस्टर परफेक्ट


 मालवणचे पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली झाली. गेले सव्वा दोन वर्षे मालवण पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. सव्वा दोन वर्षात पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्याकडून अनेक नवनवीन गोष्टी शिकता आल्या. क्राईमच्या बातम्यांसाठी आम्ही पत्रकार दररोज सायंकाळी 5.30 ते 6.30 या वेळेत मालवण पोलीस स्टेशन येथे असतो. त्यामुळे या कालावधीत आम्हाला चौधरी सरांकडून सातत्याने काहीतरी वेगळे शिकायला मिळायचे. सर मालवणात नव्याने रुजू झाले होते तेव्हा ते म्हणाले होते कि मला पोलीस स्टेशनचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. सरांचे ते विधान सव्वा दोन वर्षांनी खरे झाले आहे. सरांनी पोलीस स्टेशनमध्ये अनेक सकारात्मक बदल केले. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला समाधान मिळत असे. पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या नागरिकाचे काम लवकर झाले पाहिजे, त्याला पोलीस स्टेशनमध्ये ताटकळत रहावे लागता नये ही सरांची भूमिका होती. त्यामुळे सरांच्या या भूमिकेला अनुसरून मालवण पोलीस स्टेशनचे कामकाज व्हायचे. कोणताही नागरिक, ग्रामस्थ, तक्रारदार चौधरी सरांना भेटून आपल्या समस्या मांडायचा व सर त्या समस्यांचे निराकरण करायचे. चौधरी सरांकडे गेलेला गुन्ह्यांचा तपास सकारात्मक पद्धतीने लवकर व्हायचा. म्हणून अनेक महत्वाच्या गुन्ह्यांचे तपास सरांकडे यायचे. सरांच्या मार्गदर्शनामुळे मालवण पोलीसांनी केलेल्या तपासामुळेच बनावट पास प्रकरणातील संशयित, महिलांची फसवणूक प्रकरणातील संशयित कारागृहाची हवा खात आहे. सरांकडे कायद्याचे सखोल ज्ञान आहे. हे ज्ञान ते स्वतः पुरतेच ठेवत नाही. त्यांच्या सोबत चर्चेला बसलेल्या प्रत्येकाला देतात. त्यामुळे सरांच्यासोबत चर्चेला बसणे म्हणजे कायद्याच्या सखोल ज्ञानाची पर्वणी असायची. क्राईमच्या बातम्या लवकरात लवकर मिळाव्यात असा आमचा पत्रकारांचा प्रयत्न असतो. चौधरी सरांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कालावधी आम्हाला क्राईमच्या बातम्या कोणतेही आढेवेढे न घेता लवकरात लवकर मिळायच्या. रोज सायंकाळी सरांकडून दिवसभरात घडलेल्या क्राईम बातम्यांची माहिती मिळायची. सरांची फिटनेस जबरदस्त आहे. रोज सकाळी सर माँर्निंग वाँकला जातात. बोर्डींग ग्राऊंडला सरांचा फेरफटका असतो. आम्ही बोर्डींग ग्राऊंडवर खेळायला जायचो तेव्हा सर माँर्निंग वाँकला यायचे. आमचा ग्राऊंडला राऊंड मारुन झालेला असायचा. पण सर आले की आपल्या सोबत एक राऊंड मारायला लावत. हा राऊंड मारतानाही सरांकडून नवीन गोष्टी ऐकायला मिळायच्या. सव्वा दोन वर्षाच्या कालावधीत सरांच्या प्रत्येक कामात मला परफेक्शन दिसून आले. कोरोना कालावधीत चौधरी सर व तहसीलदार अजय पाटणे सर यांच्या सुयोग्य नियोजनामुळे मालवणात तीन महिन्याच्या कालावधीत कोरोनाचा रुग्ण सापडला नव्हता.  सर मालवणला येण्यापूर्वी रत्नागिरीला होते. आता सरांची बदली पुन्हा रत्नागिरी येथे झाली आहे. त्यामुळे सरांना पुन्हा रत्नागिरीत काम करण्याची संधी मिळाली आहे. सरांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!

                                                          संग्राम कासले, मालवण

टिप्पण्या

  1. असे कर्तव्य दक्ष अधिकारी मिळणे हे मालवणकरांचे भाग्य. खरच करोना काळातील सरांच्या नियोजन वाखाण्याजोगे आहे. आम्ही कामानिमित्त जिल्हयात फिरत असताना मालवण तालुका आणि इतर तालुक्यात यातील फरक लगेच दिसायचा. आजही प्रत्येक नागरिक मास्क शिवाय बाहेर पडायला धजावत नाही हे सरांच्या शिस्तीचे यश.. त्यामुळेच या महामारीत मालवण सुरक्षित राहिले. आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा .. पुन्हा संधी मिळाल्यास आपण बढतीने सिंधुदुर्गच्या पोलिस अधिक्षक पदी यावे हि सदिच्छा..धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.