मुख्य सामग्रीवर वगळा

इतिहासाचे रेफरन्स बुक हरपले


काल रात्री घरी येताना मोहसीन भेटला. त्याने मला थांबवून बातमी दिली, आपले बी.डी. बनसोडे सर गेले. मी क्षणभर स्तब्ध झालो. पी. के.चौकेकर, सिद्धार्थ जाधव यांच्याशी संपर्क साधून सरांच्या निधनाबद्दल विचारले. दुर्दैवाने सरांच्या निधनाची बातमी खरी होती. लहानपणापासून ज्या सरांच्या सानिध्यात वाढलो, मोठे झालो त्या बनसोडे सरांच्या अचानक जाण्याने धक्का बसला. आम्ही चाचींकडे भाड्याने राहत असताना सरही तेथेचे भाड्याने रहायचे. त्यामुळे लहानपणापासून सरांविषयी मनामध्ये भिती होती. परंतु जसजस सरांबद्दल जाणून घेत गेलो तसतशी सरांबद्दलची भिती कमी होत गेली. मी पहिलीत असल्यापासून सरांना नेहमी सामाजिक कार्यक्रमात पहायचो. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये तथागत बुद्ध, म. फुले, राजर्षी शाहू महाराज, डाँ. आंबेडकर जयंतीनिमित्त सरांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन व्हायचे. सर तथागत बुद्ध, म. फुले, रा. शाहू, डाँ. आंबेडकर यांच्या साहित्याचे अभ्यासक होते. प्रबोधनाच्या कार्यक्रमात सरांचे भाषण नेहमीच अभ्यासपूर्ण असायचे. हतिहासाच्या सनावळ्या, हतिहासाचे संदर्भ, घटनाक्रम याची इत्यंभूत माहिती सरांच्या वक्तूत्वातून मिळायची. सामाजिक कार्यक्रमात सरांची भाषणे तासनतास चालायची. सर आपल्या अमोघ वक्तृत्व शैलीने जनसमुदायाला भारुन टाकायचे. आठवी ते दहावी ही तीन वर्षे बनसोडे सरांनी आम्हाला हतिहास विषय शिकवला. ही तीन वर्षे मी व माझे भंडारी हायस्कूलमधील मित्र मैत्रिणी कधीच विसरू शकत नाही. सरांची इतिहास शिकवण्याची पद्धत अफलातून होती. सर शिकवताना मराठी, हिंदी, इंग्रजी, मालवणी भाषेचा वापर करायचे. त्यामुळे इतिहासातील प्रत्येक गोष्ट आम्हाला आवडू लागली. आम्ही सर्वजण इतिहासाचा पेपर मार्कांसाठी नाही तर नवीन काहीतरी शिकता येईल या भावनेतून लिहायचो. भारतीय स्वांतत्र्य लढ्याचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, प्रबोधन चळवळ या इतिहासातील घटना सर रंजन पद्धतीने शिकवत त्यामुळे सरांच्या तासाला आम्हाला कधीच कंटाळा आला नाही. सरांनी शिकवलेल हिटलरचे ब्लीड्स क्रिग असो वा पुणे करार सर्व गोष्टी आजही स्मरणात आहेत. सरांचे हतिहास विषयासोबत हिंदी व इंग्रजी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होत. सरांचे हिंदी व इंग्रजी ऐकणे ही आम्हा विद्यार्थ्यांनासाठी विलक्षण पर्वणी असायची. बनसोडे सर हे कडक शिस्तीचे असले तरी ते मनाने मृदू होते. अनेक वेळा सर भावनिक होताना मी पाहिले आहे. राजूरकर सरांच्या निरोप समारंभात बनसोडे सर भावनिक झाले होते. बँ. नाथ पै सेवांगण येथे सरांचा सेवानिवृत्त सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आपल्या लहानपणीची आर्थिक परिस्थिती सांगताना सरांच्या डोळ्यात अश्रु तरळले होते. सरांच्या अचानक जाण्याने आम्हा सर्वच विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे. परंतु सर आमच्यामध्ये नाही हे सत्य आज मान्य करायला हवे. सौ. बनसोडे मँडम, आशिष, मनीषा, दिपाली व बनसोडे परिवाराच्या दु:खात आम्ही सर्व विद्यार्थी सहभागी आहोत. सरांच्या जाण्याने हतिहासाचे रेफरन्स बुक मात्र हरवले आहे. सरांना आम्हा सर्व विद्यार्थ्यांनाकडून भावपूर्ण श्रद्धांजली!

                        संग्राम कासले, मालवण

टिप्पण्या

  1. भावपूर्ण श्रद्धांजली सर! ... बनसोडे सर
    आणि शिस्त हे जवळचे समीकरण. इतिहास शिकवण्यापेक्षा तो डोळ्यासमोर उभा करणे हे सरांचे वैशिष्ट्य. भाषेचे प्रभुत्व आणि चेहऱ्यावरील हावभाव होते ना त्यामुळे एखाद्या विषयावर विद्यार्थ्यांना खेळवत ठेवणे, त्याची आवड निर्माण करणे, ही लकब फक्त सरांकडेच! अर्थात जोडीला शिस्त ही होतीच. धर्मनिरपेक्ष विचारसरणी, जहाल मतवादी, पुरोगामी विचार असल्याने सर नेहमी काही मोठ्या व्यक्तीमत्वांवर मिश्कील टिप्पणीही करायचे. त्यामुळे कधी त्यांच्या तासिका संपायच्या हे कळतच नसे. सरांच्या निधनाचे वृत्त समजताच क्षणभर मन स्तब्धच झाले. जवळ असते तर अंतिम दर्शन मिळाले असते. त्यांच्या कुटुंबीयाच्या दुखाःत आम्ही सर्व त्यांचे विद्यार्थी सहभागी आहोत. ईश्वर त्यांचे आत्म्यास सद् गती देवो ही प्रार्थना!

    उत्तर द्याहटवा
  2. Bhavpurn shradhanjali sir tumchi achanak Janine aamhala acharya cha dhakkach basla tumchi English itihas aani hindi shikavnichi paddhat veglich hoti tumhi je kahi shikvaycha te aamhala patkan lakshat rahich tumchi ek aathavan mazi kayam lakshat rahili ti mhanje mi 6 vit astana mi vispithavar bhashan kel hot ti nantar tumhi maz kautuk kelat aani mla bhashan karni chi ek veglich prerna milali to mazi aayushatil sarvat sundar aathavan hoti tumchi achanak Janine mla dhakkach basla

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.