कोल्हापूरला एम.ए.च्या परीक्षेला असताना विशाल धुरी यांच्याशी माझी ओळख झाली. परंतु एम.ए.ला असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एवढ्यापुरतीच त्यांची ओळख मर्यादित होती. पत्रकारिता आणि समाजसेवा पदवीच्या निमित्ताने आमची मैत्री आणखी दृढ होत गेली. विशाल धुरी हे सावंतवाडी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सातत्याने नवनवीन गोष्टी शिकण्याची त्यांना आवड आहे. या आवडीतूनच त्यांनी पत्रकारिता आणि समाजसेवा पदवी परीक्षेला प्रवेश घेतला. विशाल धुरी यांना शेतीचीही आवड आहे. अध्यापन, वाचन याचबरोबर ते शेतीतही रमतात. विशाल कोणत्याही गोष्टीचा फारसा तणाव घेत नाहीत. सहज, सोप्या पद्धतीने कठीण गोष्ट इतरांना समजून सांगण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर अभ्यास करताना किंवा कोणत्याही प्रोजेक्टवर काम करताना विलक्षण आनंद मिळतो. पत्रकारिता कोर्सच्या निमित्ताने अनेक प्रोजेक्ट करावे लागत असत हे प्रोजेक्ट करताना विशाल धुरी सर सातत्याने मदत करतात. हि मदत फक्त एखाद्या व्यक्तीला न करता सर्वांना करतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. जागतिकीकरणामध्ये प्रत्येक क्षेत्रात काय चालले आहे याची ते माहीत मिळवत असतात. युट्यूबवरील माहिती प्रधान व्हिडीओ पाहून झाल्यावर त्याची माहिती इतरांना सांगायला ते विसरत नाहीत. विशाल यांचे मन फार विशाल आहे. या मनात प्रत्येक मित्रांसाठी खास घर आहे. कोणताही तणाव आला, समस्या आली तर आपण विशाल यांना बिनदिक्कतपणे सांगू शकतो हिच विशाल यांची खास ओळख आहे. आज विशाल यांचा वाढदिवस आहे. विशाल यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा