भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त बार्टीच्या समतादूतांच्यावतीने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि निबंध स्पर्धा खुली असणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पत्रकारीतेतील योगदान' असा निबंध स्पर्धेचा विषय असून शब्दमर्यादा 500 ते 1000 शब्दापर्यंत आहे. स्पर्धकांनी निबंध स्वहस्ताक्षरात लिहून किंवा टाईप करून श्यामल सावंत (9420726374) यांच्या व्हॉटसअप क्रमांकावर 4 एप्रिलपर्यंत पाठवावेत. स्पर्धेतील विजेत्यांना 1000 रूपये, 700 रूपये, 500 रूपये तसेच प्रमाणपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले. नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा