फुले, शाहू, विचारमंच मालवण यांच्यावतीने 14 एप्रिल रोजी मामा वरेरकर नाटय़गृह मालवण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती महोत्सव साजरा केला जाणार आहे. संयुक्त जयंतीनिमित्त मालवणमध्ये 14 व 15 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 14 रोजी सकाळी 8 ते 9 वाजता एस. टी. स्टँड येथील समाजमंदिर येथे धम्म ध्वजारोहण व पूजापाठ, रॅली - सकाळी 9 ते 10.30 वाजता (समाजमंदिर एस. टी. स्टँड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बांगीवाडा), सकाळी 11 ते 1.30 वाजता मामा वरेरकर नाटय़गृह येथे जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यक प्रा. डॉ. राजन गवस उपस्थित राहणार आहेत. सभेच्या अध्यक्षस्थानी किशोर चव्हाण, प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास आधिकारी जे. पी. जाधव तसेच दोडामार्ग गटविकास अधिकारी मिलींद जाधव, नायब तहसीलदार आनंद मालवणकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दुपारी 1.30 ते 2.30 स्नेहभोजन, दुपारी 2.30 वाजता स्वरनिनाद कट्टा निर्मित ऑक्रेस्टा क्रांतीसूर्य हा भिमगीतांचा कार्यक्रम होणार आहे. 15 रोजी रात्री 9.30 वाजता एस. टी. स्टँड समाजमंदिर येथे स्थानिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा