महाविद्यालयातील अनु.जाती, इमाव, विमाभज व विशेष मागास प्रवर्गातील सन 2020-21 व 2021-22 करिता महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी व जुन्या अर्जाच्या नुतनीकरणासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. हि प्रक्रिया शासनाच्या आपले सरकार पोर्टलवलरील https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरु असल्याचे दिपक घाटे, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त यांनी कळवले आहे. जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यार्थी व पालक यांनी जे विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित असतील अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज व जुन्या अर्जाचे नुतनीकरण 30 एप्रिलपर्यंत करावेत. विद्यार्थ्यांचे अर्ज विहीत मुदतीत भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची आहे. या योजनेपासून मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्यास त्यास संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य जबाबदार राहतील. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, सिंधुदुर्ग या कार्यालयाशी दूरध्वनी क्र. 02362-228882 येथे संपर्क साधवा.
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले. नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा