सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) यांच्या समतादूत प्रकल्पाअंतर्गत जिल्हय़ात सामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बार्टीतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांना साने गुरूजी वाचन मंदिर येथे रोख पारितोषिक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात निबंध स्पर्धेतील विजेती श्रद्धा पाटकर, शितल कदम, माधवी तिरोडकर यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी बार्टीचे प्रकल्प अधिकारी विजय कदम, अँड. सुदिप कांबळे, सुजित जाधव, सगुण जाधव, श्यामल सावंत, राजू दिनदयाळ, संग्राम कासले, ऋतुजा केळकर, मेघना जोशी, संजयकुमार रोगे तसेच वाचन मंदिराचे कर्मचारी उपस्थित होते. समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त दिपक घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली समता सप्ताहाच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा