क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले व भारतीय संविधानाचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचच्यावतीने मालवण शहरात भव्य रँली काढण्यात आली. या रँलीत धम्मबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मालवण एसटी स्टँड समाजमंदिर येथून बांगीवाडा डाँ. आंबेडकर पुतळापर्यंत हि रँली काढण्यात आली. या रँलीमध्ये आकर्षक चित्ररथ सहभागी झाले होते. या चित्ररथांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले. नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...



जय भिम
उत्तर द्याहटवाजय भिम🙏🙏
उत्तर द्याहटवा