आमचे पत्रकार मित्र सिद्धेश आचरेकर व पोलीस कर्मचारी स्वाती जाधव - आचरेकर यांची सुकन्या ज्ञानदा हिच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त आचरेकर कुटुंबियांच्यावतीने साळेल येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्ञानदा हिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त देखील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानदाच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक जाणीव ठेवून सिद्धेश आणि त्यांच्या कुटुंबीयांनी राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे. आचरेकर कुटुंबियांनी रक्तदानाच्या उपक्रमात सातत्य ठेवावे, ज्ञानदाला दुसऱ्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा