सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागअंतर्गत सामाजिक समता सप्ताहानिमित्त समाजकल्याण सिंधुदुर्ग, मालवण नगरपरिषद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह व बार्टी यांच्यावतीने मालवण एसटी स्टँड येथील समाजमंदिर येथे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी वसगीगृहाचे गृहपाल के. एस. इंदलकर, संग्राम कासले, कर्मचारी सिद्धीविनायक चिपकर, मयुर कदम, अमित जाधव, मयुरेश सावंत, नगरपरिषद कर्मचारी विश्राम जाधव, मिथुन शिगले, नरेश वायंगणकर, सुनिल देऊलकर, हेमंत वायंगणकर, आदि उपस्थित होते. यावेळी साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊसाठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत मालवण एसटी स्टँड ते दलितवस्ती रस्ता रूंदीकरण व पेव्हर ब्लॉक व क्रांक्रिटीकरण करणे या विकासकामाचा लाभ घेतलेल्या नागारिकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त दिपक घाटे यांच्या मागदर्शनाखाली सदरचा कार्यक्रम राबविण्यात आला.
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले. नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा