समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समाजिक समता सप्ताहानिमित्त जिल्हय़ात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक समता सप्ताहानिमित्त मालवण तालुक्यातील विविध भागांमध्ये पथनाटय़ाचे सादरीकरण करण्यात आले. या पथनाटय़ामध्ये बार्टीच्या समतादूतांनी सहभाग घेतला होता. मालवण शहर, मालवण फोवकांडा पिंपळ, वायरी भूतनाथ, समाजकल्याण वसतीगृह येथे पथनाटय़ाचे सादरीकरण करण्यात आले. या पथनाटय़ातtन समाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती तसेच समाजसुधारकांच्या कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. पथनाटय़ामध्ये बार्टीचे प्रकल्प अधिकारी विजय कदम, अँड. सुदिप कांबळे, सुजित जाधव, श्यामल सावंत, सगुण जाधव, राजू दिनदयाळ, सुहास मोचेमाडकर, संग्राम कासले यांनी सहभाग घेतला होता. यावेळी अँड. सुदिप कांबळे यांनी प्रबोधन गीते सादर केली. समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त दिपक घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक समता सप्ताहाचे विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा