शालेय, महाविद्यालयीन शिक्षण सुरु असताना आणि त्यानंतर आजपर्यंत अनेक वेळा एक काँमन वाक्य ऐकायला मिळते. बाकी तुमचे सगळे ठिक आहे पण सरकारी नोकरी हवी होती? त्यामुळे प्रत्येक वेळी मनात प्रश्न निर्माण होतो कि सरकारी नोकरी मिळाली कि तो माणूस जीवनात यशस्वी होतो का? आज नक्कीच या वाक्यांचा पुन्हा विचार करण्याचा वेळ आला आहे. कारण मी अनेक वर्षे पत्रकारिता व सामाजिक उपक्रमात कार्यरत आहे. पत्रकारिता व सामाजिक उपक्रम माणसाचे जीवन यशस्वी करु शकत नाही का? महिन्याला 7 ते 8 हजार रुपये कमावणाऱ्या माणसाला समस्या, ताणतणाव असतात तशाच त्या महिन्याला लाखो, कोट्यावधी कमावणाऱ्या माणसाला असतात. परंतु दोन्ही माणसे या समस्या, तणाव यावर मात करुन महिनात सूख, दु:ख अशा वातावरणात काढत असतात. त्यामुळे सरकारी नोकरी हि माणसाच्या जीवनाचे ठरवू शकत नाही. माणसाच्या प्राथमिक गरजा भागवून आपल्या कुटुंब, मित्र परिवारासोबत आनंदात जीवन जगणे मला महत्वाचे वाटते. कमी पगार असूनही आमच्या पत्रकारिता व सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या मित्रांसोबत छोटे गेट टू गेदर, चहा, नाश्ता करणे मला मनस्वी आनंद देते. कारण संकटांच्यावेळी हेच मित्र माझ्या मदतीसाठी येतात. त्यामुळे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यात अपयश येत आहे. पण प्रयत्न करणे सोडलेले नाही. प्रयत्न सुरु आहेत. सरकारी नोकरी मिळेल कि नाही हे माहिती नाही. पण सध्या जीवनाचा आनंद घेत आहे. समस्यांसोबत लढत आहे आणि दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा