छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राज्यात सामाजिक न्याय दिन संमेलन सप्ताह साजरा होत आहे. यानिमित्त सामाजिक न्याय विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेत सावंतवाडीच्या नीता सावंत यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. द्वितीय क्रमांक सानिका वायंगणकर (मालवण) राजन जाधव (वेंगुर्ला) तर तृतीय क्रमांक संजय तांबे (कणकवली) अथर्व कोचरेकर (कणकवली) यांना विभागून देण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी एकूण 15 निबंध प्राप्त झाले होते. स्पर्धेचे परीक्षण डीएड कॉलेजचे प्रा. नागेश कदम यांनी केले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २ जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता श्री पुष्पसेन कॉलेज ऑफ फार्मसी ओरोस येथे संपन्न होणार आहे. तरी विजेत्या सर्व स्पर्धकांनी पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे व बार्टीचे प्रकल्प अधिकारी विजय कदम यांनी केले आहे.
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले. नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा