मालवण - भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवणच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कट्टा येथे 75 वा संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष रविकांत कदम, तालुका संस्कार उपाध्यक्ष नचिकेत पवार, संस्कार सचिव मिलिंद पवार, योगेश वराडकर, प्रचार व पर्यटन सचिव संग्राम कासले, सचिन कासले, संरक्षण सचिव रमेश कदम, पौर्णिमा कासले इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्धांच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून व वंदना सूत्रपठण घेऊन करण्यात आली. तदनंतर संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले. संग्राम कासले यांनी संविधानाविषयीची माहिती दिली तसेच तालुकाध्यक्ष रविकांत कदम यांनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमात प्रास्ताविकेचे वाचन नचिकेत पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन योगेश वराडकर यांनी केले.
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले. नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा