गाव शाखा पेंडूर चरीवाडी बौद्धवाडी, बौद्ध विकास मंडळ मुंबई, युवा सार्थक मित्र मंडळ चरीवाडी यांच्यावतीने पेंडू चरीवाडी बौद्धवाडी येथे जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या निमित्ताने पेंडूर चरी वाडी बौद्धवाडी येथील जयंती उत्सवासाठी उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली. या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने नोंदवलेली काही निरीक्षणे.
1. जयंती उत्सवामध्ये धम्म बांधवांचा सहभाग लक्षणीय होता
2. जयंती उत्सवामध्ये युवा व तरुणांना संधी देण्यात आली होती.
3. सूत्रसंचालन करताना सूत्रसंचालकाकडून चूक झाली तर त्याची चूक समजावून घेऊन ज्येष्ठ तरुणांना प्रोत्साहन देत होते.
4. जयंती उत्सवामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
4. वैचारिक चळवळ हाच फुले, शाहू, आंबेडकर चळवळीचा गाभा असल्याने दोन वक्त्यांना निमंत्रित करण्यात आले होते.
5. अगदी वेळेत कार्यक्रम सुरू करण्यात आला.
6. विचार मंचावरील पदाधिकाऱ्यांनी अतिशय कमी वेळात मनोगते व्यक्त केली. प्रमुख वक्त्यांना बोलण्याची संधी दिली.
7.मुख्य म्हणजे उपस्थित धम्म बांधव अत्यंत मन लावून सर्वांचे विचार ऐकत होते. विचार पटल्यास टाळ्यांची दात देत होते.
*संग्राम सतीश कासले*
*भारतीय बौद्ध महासभा प्रचार व पर्यटन विभाग सचिव*
*तालुका-मालवण*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा