*डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह मालवण येथे 2025 - 26 करिता मोफत प्रवेश*
मालवण वार्ताहर -
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग नियंत्रणाखालील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुला मुलींचे शासकीय व वसतीगृह मालवण येथे सन 2025 - 26 करिता मोफत प्रवेश देणे सुरू आहे.
वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट सुसज्ज आणि प्रशस्त इमारत, निवासाची प्रशस्त अशी व्यवस्था, उत्कृष्ट भोजन व्यवस्था, शैक्षणिक साहित्य, सुसज्ज ग्रंथालय, वाचनासाठी नियमित पाच वृत्तपत्रे, इंटरनेट व वाय-फाय सह अद्यावत संगणक कक्ष, मनोरंजनाकरिता दूरदर्शन संच, खेळ साहित्य ग्रीन जिम साहित्य, निर्वाह भत्ता प्रतिमाह रुपये 500/-, स्वच्छता भत्ता प्रतिमा रुपये 100/- (मुलींकरिता), स्टेशनरी करिता प्रति वर्ष रुपये 4000/- (महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता), छत्री गम बूट करिता प्रतिवर्ष रुपये 500/-, गणवेश करिता प्रति वर्ष रुपये 1000/-( विद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता)
प्रति वर्ष दोन हजार रुपये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता
दिनांक 26 जुलै 2011 च्या शासन निर्णयानुसार नमूद प्रमाणे सोयी सुविधा पुरविण्यात येतात. त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांनी आपला वसतिगृहप्रवेश ऑनलाईन पद्धतीने निश्चित करावा. hmas.mahait.org
ऑनलाइन प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे - जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, शाळा महाविद्यालय सोडल्याचा दाखला, मागील वर्षाचे गुणपत्रक, बोनाफाईड किंवा शाळा प्रवेश निश्चितीची पावती, रहिवासी दाखला, आधार कार्ड
प्रवेशाकरिता संपर्क - माननीय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग तसेच गृहपाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह मालवण, मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह वायरी भूतनाथ तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग.
ReplyForward |

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा