श्री देव खापरेश्वर वाचनालय व ग्रंथालय कोळंब व आयुष्मान आरोग्य मंदिर कोळंब यांच्या संयुक्त विध्यमाने जागतिक योग दीना निमित्त प. पु. नाटेकर आजी मठ हॉल कोळंब येथे दि. 21 जून 2025 रोजी सकाळी 7 वाजता योगासन शिबीर आयोजित करण्यास आले. श्री. अंकुश कणेरकर सर व सौ. मनाली सातार्डेकर यांचं उपयुक्त मार्गदर्शन मिळालं. कनेरकर सरांनी योगासनांची प्रात्यक्षिके करत प्रशिक्षणार्थ्याना विविध आसने व योगाचे महत्व सांगितले. सौ. मनाली सातार्डेकर मॅडमनी उपस्थित महिलांना व सर्वाना योगासन करण्यासाठी योग्य अयोग्य गोष्टीची माहिती दिली. कोळंब गावचे पोलीस पाटील श्री संग्राम कासले यांनी मार्गदर्शन केले. कोळंब आरोग्य उपकेंद्राचे डॉ. प्रशांत पवार यांचे आरोग्य व योगा संदर्भात मार्गदर्शन करताना हा उपक्रम लोकहीतकारी असून याचा उपयोग सर्वांनी करावा.
वाचनालायचे अध्यक्ष सुनील फाटक यांनी योगासनाचे हे एक दिवशीय शिबीर त्याला अतिशय सुंदर भरघोस मिळालेला प्रतिसाद पाहून कनेरकर सर व सौ मनाली आचरेकर यांना विनंती करून असेच योगासनाचे प्रशिक्षण आठवड्यातून यातून एक दिवस घ्यावे अशी विनंती केली व या विनंतीला मान देऊन कनेरकर सरांनी व सौ. मनाली सातार्डेकर यांनी सहमती दर्शविली आता या पुढे प्रत्येक रविवारी सकाळी 6.30 वाजता प. पु. नाटेकर आजी मठ हॉल येथे विनामूल्य योगासन वर्ग सुरु करण्यात आले आहेत. तरी कोळंब गावातील सर्व ग्रामस्थानी याची नोंद घ्यायची आहे व मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती करण्यात आली. या शिबिराला सुंदर परब, पुरषोतम भोजने, शशिकांत मेथर, दिलिप नेमळेकर, सूर्यकांत कासले, दीनानाथ कांदळगावकर, मानसिंग लाटकर, प्रियंतमा भोजने, दिपा फाटक, सुधीर लोके, प्रसाद बांदेकर, बापू बावकर, ज्ञानदेव ढोलम, शेखर परब, सुचिता लोके, शरद लोके, वसुधा कदम, कामिनी लाड, पंकज नेरकर, दत्ता पिंगुळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सुनील फाटक यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे घोषित करण्यात आले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा