श्री देव खापरेश्वर वाचनालय व ग्रंथालय कोळंब यांच्या वतीने प. पू. नाटेकर आजी येथील मठाच्या हॉलमध्ये दर रविवारी पहाटे 6.30 वाजता योगासनांचे प्रात्यक्षिक व संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. त्यासाठी मार्गदर्शक म्हणून अंकुश कनेरकर सर व सौ. मनाली सातार्डेकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. हे योगाभ्यास वर्ग कोळबच्या सर्व ग्रामस्थांसाठी विनामूल्य आहेत. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव खापरेश्वर वाचनालय व ग्रंथालय कोळंब यांचे अध्यक्ष सुनील फाटक यांनी केले आहे. योगाभ्यासाठी येताना सर्वांनी वेळेत यायचे आहे व येताना स्वतःसाठी सतरंगी चटई किंवा सादर घेऊन यावे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा