भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण संस्कार विभागाच्या वतीने आज आषाढ पौर्णिमेनिमित्त डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कट्टा येथे वर्षावास प्रवचन मालिका उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, जिल्हा तालुकाध्यक्ष रविकांत कदम, तालुका सरचिटणीस प्रकाश पवार, तालुका संस्कार उपाध्यक्ष नचिकेत पवार, संस्कार सचिव मिलिंद पवार, योगेश वराडकर, हिशोब तपासणीस शंकर कदम, प्रचार व पर्यटन सचिव संग्राम कासले, सचिन कासले, जिल्हा महिला संस्कार उपाध्यक्ष स्नेहा पेंडुरकर, अरुण जाधव, लीलाधर तळगावकर, संदीप तळगावकर, नीलकंठ तळगावकर, संदीप कदम, तसेच मोठ्या संख्येने उपासक उपासिका उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी प्रवचनकार प्रकाश पवार यांनी वर्षावासाचे महत्व व आषाढ पौर्णिमा तसेच गुरु पौर्णिमेचे महत्व सविस्तररित्या सांगितले. तसेच शिवप्रसाद चौकेकर, रविकांत कदम, यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आद. योगेश वराडकर यांनी केले तर प्रास्ताविक नचिकेत पवार यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रविकांत कदम यांच्या अध्यक्षीय मनोगतानंतर सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा