मालवण वार्ताहर - फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच मालवण यांच्या वतीने रविवार १३ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे डॉ. दीक्षित यांची जीवनशैली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. इंजिनीयर प्रकाश चव्हाण हे डॉ. दीक्षित जीवनशैली यावर समुपदेशन करणार आहेत. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले. नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा