मालवण वार्ताहर - प्राथमिक कन्या शाळा मालवण येथे रानभाज्यांची ओळख व्हावी यासाठी रानभाजी ओळख व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध रानभाज्यांचे प्रदर्शन मांडले होते. जिल्ह्यामध्ये आढळणाऱ्या रानभाज्यांचा या प्रदर्शनात समावेश करण्यात आला होता. याप्रसंगी प्राथमिक कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.श्रद्धा गोसावी, सौ. शिवानी पाटकर, सौ. शुभ्रा कांदळगावकर, श्रीम.आकांक्षा कासले, श्रीम. नेत्रा टिळवे आदी उपस्थित होत्या. सुनितादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर मालवणच्या शिक्षक तसेच छात्राध्यापकांनी रानभाज्या प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांनी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले. नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा