मालवण वार्ताहर - मंदिरांमधील फंडफेटीमधील रोख रक्कम चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील मंदिरांमध्ये सीसीटीव्ही बसविणे बाबत मंदिर विश्वस्त, मंदिराचे पदाधिकारी यांना अवगत करावे अशा प्रकारच्या सूचना पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी पोलीस पाटील यांच्या बैठकीत पोलीस पाटील यांना दिल्या.
मालवणचे नूतन पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी मालवण पोलीस स्थानक हद्दीतील पोलीस पाटील यांची गुरुवारी पोलीस स्थानिक येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मारुती जगताप यांनी पोलीस पाटील यांना मार्गदर्शन केले. यावेळी मालवण मधील पोलीस पाटील यांच्या हस्ते नूतन पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी मोहरम व आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलीस पाटील यांना सूचना दिल्या. तसेच गाव पातळीवर काम ग्रामरक्षक दल कार्यान्वित कराव अशा प्रकारच्या सूचना दिल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा