मुख्य सामग्रीवर वगळा

किल्ले सिंधुदुर्गचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश झाल्याने मालवणात आनंदोत्सव

मालवण (वार्ताहर)

मालवण येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश झाल्याने प्रशासन तसेच किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने मालवण बंदर जेटी येथे शिवप्रेमींच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने ढोल ताशांचा गजर करीत, गुलाल उधळीत, फटाक्यांची आतषबाजी आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्लेवैभव असलेले १२ किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. यामध्ये मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गचा समावेश झाल्याने मालवणात आनंदाचे वातावरण असून पार्श्वभूमीवर प्रशासन व किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने मालवण बंदर जेटी येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी करत साजऱ्या केलेल्या या आनंदोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज कि जय... जय भवानी जय शिवाजी... धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय... हरहर महादेव... अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजप नेते अतुल काळसेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. यानंतर शिवप्रार्थना झाली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिन्द्र सुकटे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार वर्षा झाल्टे, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, भाजप नेते अतुल काळसेकर, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, इतिहास अभ्यासक सौ. ज्योती तोरसकर, अशोक सावंत, सुदेश आचरेकर, बाबा मोंडकर, शिल्पा खोत, विजय केनवडेकर, भाऊ सामंत, यतीन खोत, आबा हडकर, ललित चव्हाण, गणेश कुशे, दादा वेंगुर्लेकर, सुर्यकांत फणसेकर, अन्वेषा आचरेकर, पूजा सरकारे, रविकिरण तोरसकर, प्रमोद करलकर, रत्नाकर कोळंबकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, भालचंद्र राऊत, महेश मांजरेकर, दादा वाघ, दाजी सावजी, आर. एन. काटकर, विशाल ओटवणेकर, हितेश वायंगणकर, मंडळ अधिकारी पीटर लोबो, तलाठी श्री. राठोड, बंदर विभागाचे श्री. कदम व इतर उपस्थित होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिन्द्र सुकटे म्हणाले, सिंधुदुर्ग किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश झाल्याने प्रशासनाला वं सिंधुदुर्गवासियांना भरपूर आनंद झाला आहे, आपल्या जिल्ह्यातील सिंधुदुर्ग व विजयदुर्ग हे दोन किल्ले यामध्ये समाविष्ट झाले असल्याने याचा विशेष आनंद आहे, असेही ते म्हणाले. गुरुनाथ राणे यांनी महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींसाठी हा एक अभिमानास्पद क्षण आहे. गडकिल्ल्यांवर प्रेम करणाऱ्या व त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांची तपश्चर्या आज फळास आली आहे, असे सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.