मालवण वार्ताहर - भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण यांच्यावतीने आषाढ पौर्णिमा 10 जुलै ते अश्विन पौर्णिमा 7 ऑक्टोबर पर्यंत मालवण तालुक्यामधील गाव शाखांमध्ये वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.
12 जुलै - तळगाव - भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन विशुद्धी मार्ग - विलास वळंजू, 20 जुलै - वराड - भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत - विजय हरकुळकर, 26 जुलै - धामापूर - महाबोधी विहार व बौद्धांची पवित्र स्थळे - संजय पेंडूरकर, 2 ऑगस्ट - काळसे - बौद्धांचे सण व मंगल दिन - शिवप्रसाद चौकेकर, 9 ऑगस्ट गोळवण- महामंगल सुत्त - गौतम पळसबकर, 10 ऑगस्ट - वडाचापाट - अनित्य, अनाथम व दुःख- शंकर कदम, 10 ऑगस्ट मसदे - अनित्य, अनाथम, दुःख - मिलिंद पवार, 15 ऑगस्ट - चौके - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी योगदान - संग्राम कासले, 16 ऑगस्ट - पेंडुर चरीवाडी- बौद्ध धम्म आणि विज्ञान - योगेश वराडकर, 23 ऑगस्ट - पेंडूर खरारे - बौद्धांच्या आचारसंहिता - विश्वनाथ कदम, 31 ऑगस्ट हिवाळे - विश्वगुरू तथागत भगवान गौतम बुद्ध - शंकर कदम, 6 सप्टेंबर - ओवळीये - पराभव सूक्त - माणसाच्या पराभवाची कारणे - नचिकेत पवार, 13 सप्टेंबर - हेदुळ- बौद्ध धम्म आणि मानवता - शशिकांत पवार, 15 सप्टेंबर - रामगड - बौद्ध धम्माची खास वैशिष्ट्ये - अमित पवार, 17 सप्टेंबर- शिरवंडे - सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचे महान कार्य - प्रकाश पवार, 20 सप्टेंबर - राठिवडे - कालामसूक्त - सूर्यकांत कदम, 27 सप्टेंबर - कुणकवळे - त्याग मूर्ती माता रमाई - नेहा काळसेकर, 28 सप्टेंबर - तिरवडे - बौद्ध धम्म आणि मानवता- शंकर कदम, 2 ऑक्टोंबर - डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन कट्टा - डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मक्रांती गतिमान कशी केली? - रविकांत कदम, 4 ऑक्टोबर - आचरा - स्त्रियांचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राध्यापक नंदू हेदुळकर, 7 ऑक्टोंबर - चुनवरे - बौद्ध धम्म आणि मानवता - भगवान जाधव
वरील प्रमाणे गावामध्ये वर्षावास कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे. वर्षावास प्रवचन मालिका सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. वर्षावास प्रवचन मालिकेसाठी सर्वांनी पांढऱ्या शुभ्र पोशाखात व वेळेत उपस्थित रहावे. असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखाध्यक्ष रविकांत कदम व सरचिटणीस प्रकाश पवार यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा