मुख्य सामग्रीवर वगळा

*संत गाडगेबाबांचे विचार आचरणात आणा* -संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमात श्रीधर काळे यांचे प्रतिपादन-

मालवण वार्ताहर - संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचे महत्व सांगताना समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा नष्ट व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले. संत गाडगेबाबा यांचे विचार आज समाजातील प्रत्येक माणसाला आवश्यक आहेत. असे असे प्रतिपादन एलआयसीचे सेवानिवृत्त अधिकारी श्रीधर काळे यांनी  श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघाच्या वतीने आयोजित संत गाडगे महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने कोळंब येथे बोलताना केले. 
     याप्रसंगी लेखिका मेघना जोशी, चंद्रकांत गोखले, कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण म्हापणकर, तालुकाध्यक्ष मोहन वालकर, खजिनदार आप्पा परुळेकर, सौ. पूजा करलकर, सौ. राधा मोंडकर,  मोहन चिंदरकर, जयवंत चव्हाण, कोळंब उपसरपंच विजय नेमळेकर, हेमंत वालकर, उत्तम चव्हाण, अनिल चव्हाण, सुभाष चव्हाण, अजित चव्हाण, बबन नेमळेकर, गोट्या कडू, सुजित नेमळेकर, शरद चव्हाण, दाजी कोळबकर, किरण चव्हाण, अर्जुन चव्हाण, दिलीप नेमळेकर, मुरलीधर गोवेकर, विजय हिंदळेकर आदी उपस्थित होते. 
   याप्रसंगी चंद्रकांत गोखले, मेघना जोशी यांनी संत गाडगेबाबा यांच्याविषयीचे विचार व्यक्त केले. सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन अशोक नेमळेकर व श्रीपाद कडू यांनी आपल्या निवासस्थानी केले. सौ माधवी वालकर यांनी दरवर्षीप्रमाणे हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संग्राम कासले यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.