मुख्य सामग्रीवर वगळा

*सक्षम व जनाधार असलेल्या राजकीय पक्षाची कास धरणार असल्याचे महेश परुळेकर यांचे सुतोवाच*

 कुडाळ - वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांनी भविष्यातील राजकीय भूमिका निश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील मित्रपरिवार, हितचिंतक, कार्यकर्ते तसेच सहकारी यांची बैठक कुडाळ येथे आयोजित केली होती. या बैठकीत महेश परुळेकर यांनी समाजातील वंचित, उपेक्षित व दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी सक्षम व जनाधार असलेल्या राजकीय पक्षाची कास धरणार असल्याचे सुतुवाच केले आहे. त्यामुळे महेश परुळेकर आता कोणत्या राजकीय पक्षासोबत जाणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
        महेश परुळेकर हे 1997 पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक, आणि विद्यार्थी आघाडीवर तसेच विविध धार्मिक संघटनेचे काम करत आहेत. 2014 मध्ये जनता दल या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील समस्यांकरता अनेक आंदोलने, मोर्चा निवेदने आणि वैयक्तिक स्वरूपाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. 2017 मधें महेश परुळेकर यांना भारिप बहुजन महासंघ या ऍड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाची जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली. 2017 ते माहे नोव्हेंबर 2025 पर्यंत भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. 
      *महिनाभर वंचित कडून संपर्क नाही*
   मी वंचित बहुजन आघाडीचा आजीव सभासद आहे. नोव्हेंबर मध्ये वंचित पक्षाकडून माझ्या नेतृत्वाखालील वंचितची सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारणी बरखास्त करण्यात आली. परंतु गेले महिनाभर कोणत्याही पद्धतीचा संपर्क पक्षाच्या वरिष्ठ व नवनिर्वाचित सदस्यांनी केला नसल्याचे परुळेकर यांचे म्हणणे आहे.      
       *म्हणूनच वैयक्तिक भूमिका घेण्याचे ठरवले*
 गेली 29 वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध बांधव, मराठा बांधव, चर्मकार बांधव, नाभिक बांधव, कुंभार बांधव अदिक्षित बांधव यांच्यासहित वेगवेगळ्या समाजाच्या मूलभूत समस्यांवर काम करण्यासाठी आपण योगदान दिले आहे. त्यामुळे या सर्व समाजातील लोक माझ्यासोबत जोडले आहेत. पक्षाचे काम करत असताना मी कधीही माझ्या नात्यागोत्यातल्या लोकांना पदे दिली नाहीत तर समाजामध्ये खऱ्या अर्थाने जो काम करतो त्या व्यक्तीला नेतृत्व करण्याची संधी मी दिली या माझ्या स्वभावामुळे कदाचित काही लोकांना मी नकोसा झालो होतो आणि म्हणूनच जातीच्या बाहेर गेलेली आंबेडकरी चळवळ पुनश्च जातीत बंदिस्त करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मी माझी वैयक्तिक भूमिका घेण्याचे ठरवले आहे असे महेश परुळेकर यांनी कुडाळ येथे झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. 
      यावेळी वेंगुर्ले , सावंतवाडी , कुडाळ , मालवण , कणकवली या तालुक्यातील महेश परूळेकर यांच्या सोबत काम करत असलेले वंचित बहुजन आघाडीचे  जिल्हा आणि तालुका पदाधिकारी जिल्ह्यातील बुद्धिजीवी, कर्मांचारी, जिल्ह्यातील पतसंस्थेचे पदधिकारी, संचालक तसेच महेश परूळेकर यांच्याशी संबंधित वकील , पत्रकार आणि अन्य बहुसंख्य प्रतिनिधी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.