मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे क्षणचित्रे

आज कलिंगडाचा आस्वाद

बार्टीच्या वतीने वनंद येथे रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी

     डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांची जयंती त्यांच्या वनंद या गावी उत्साहात साजरी करण्यात आली.  या जयंतीनिमित्त बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनंद येथे विविध उपक्रम राबविण्यात आले.  यामध्ये बार्टी तर्फे 15 टक्के दराने पुस्तक वाटप, उपस्थित लोकांसाठी मोफत भोजन, व संविधान प्रास्ताविका वाटप करण्यात आले. यावेळी विभाग प्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात, विधी अधिकारी आयवळे, उपअभियंता आकाश कुऱ्हाडे, प्रकल्प अधिकारी योगेश कोलते, समतादूत विभागाचे रत्नागिरीचे प्रभारी प्रकल्प अधिकारी आशिष कांबळे, सिंधुदुर्गचे प्रभारी प्रकल्प अधिकारी विजय कदम, समतादूत प्राजक्ता मराठे, सुदीप कांबळे, सुजित जाधव, सुहास मोचेमाडकर, सगुण जाधव, महेश्वरी विचारे, रूपाली बाईत, राजू दीनदयाळ, आदी उपस्थित होते.  यावेळी बार्टीच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुस्तक वाटप स्टॉलकडे नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. जयंतीसाठी आलेल्य...

दहा रुपयाचा वडापाव

दहा रुपयाचा वडापाव हे शीर्षक वाचून अनेकांना वेगळं वाटलं असेल. कारण सध्या वडापावचे दर हे वाढलेले आहेत. मी वडाचापाट येथे गेलो असता मला दहा रुपयाला वडापाव असा बोर्ड दिसला. मी त्या दुकानाच्या जवळ गेलो. आणि जवळून वडापाव पाहिले तर वडापाव ची साईज देखील मोठी होती. त्यामुळे मी उत्सुकतेने हॉटेलचे मालक यांना विचारले दहा रुपयाला वडापाव कसा काय? त्यावेळी ते मालक म्हणाले माझं नाव बाळापुर मी पेंडूरचा आहे पण मी मुंबईला असतो लालबाग चिंचपोकळी येथे माझा वडापावचा व्यवसाय आहे. मी दोन रुपयापासून वडापाव विकायला सुरुवात केली होती आज मी विकत असलेल्या वडापावची किंमत दहा रुपये आहे. अनेक जण माझ्याकडचा वडापाव लालबाग चिंचपोकळी येथे आल्यावर आवर्जून खातात. मी देखील दहा रुपयाच्या वडापावचा आस्वाद घेतला अतिशय अप्रतिम होता. तुम्ही कधी लालबाग चिंचपोकळीला गेला तर या वडापावचा आस्वाद अवश्य घ्या. बाळा परब संपर्क 9152141502

प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाला उपस्थिती

आज सकाळी कोळंब कातवड प्राथमिक शाळा तसेच कोळंब ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो.

पपई उपलब्ध आहेत हवे असल्यास संपर्क साधा

आज सकाळी काढलेले पपई उपलब्ध आहेत. कोणाला हवे असल्यास संपर्क साधावा

मुलांना वृत्तपत्र वाचायची सवय लावा - दिवाणी न्यायाधीश एम. आर. देवकते यांचे प्रतिपादन

सोशल माध्यमांच्या युगात वाचनाची आवड कमी होत चालली आहे. घरामध्ये लहान मुले वाचताना दिसत नाही. त्यामुळे पालकांनी मुलांना मराठी वृत्तपत्र वाचण्याची सवय लावणे गरजेचे आहे. वाचनामुळे मुलांमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण होण्यास मदत होणार आहे. असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश एम. आर. देवकते यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजीत कार्यक्रमाप संगी बोलताना केले. दिवाणी न्यायालय मालवण व मालवण तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिवाणी न्यायाधीश एम. आर. देवकते हे बोलत होते. यावेळी पत्रकार संग ाम कासले, सहायक अधिक्षक एम. जी. डीसोजा, एस. एन. पालव आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना देवकते म्हणाले, आज पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे दिसत आहे. परंतु असे असले तरी मराठी भाषेविषयीची मुलांची ओढ कमी होउ देता कामा नये. त्यासाठी पालकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पालकांनी स्वत वाचनाची सवय लावुन मुलांनाही वृत्तपत्र, पुस्तक वाचण्यास प्रवृत्त केले पाहिजे. याप्रसंगी बोलताना संग्राम...