मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

पेंडूर चरीवाडी बौद्धवाडी येथील जयंती उत्सव

       गाव शाखा पेंडूर चरीवाडी बौद्धवाडी, बौद्ध विकास मंडळ मुंबई, युवा सार्थक मित्र मंडळ चरीवाडी यांच्यावतीने पेंडू चरीवाडी बौद्धवाडी येथे जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या निमित्ताने पेंडूर चरी वाडी बौद्धवाडी येथील जयंती उत्सवासाठी उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली. या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने नोंदवलेली काही निरीक्षणे. 1. जयंती उत्सवामध्ये धम्म बांधवांचा सहभाग लक्षणीय होता  2. जयंती उत्सवामध्ये युवा व तरुणांना संधी देण्यात आली होती.      3. सूत्रसंचालन करताना सूत्रसंचालकाकडून चूक झाली तर त्याची चूक समजावून घेऊन ज्येष्ठ तरुणांना प्रोत्साहन देत होते.  4. जयंती उत्सवामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.  4. वैचारिक चळवळ हाच फुले, शाहू, आंबेडकर चळवळीचा गाभा असल्याने दोन वक्त्यांना निमंत्रित करण्यात आले होते.  5. अगदी वेळेत कार्यक्रम सुरू करण्यात आला.  6. विचार मंचावरील पदाधिकाऱ्यांनी अतिशय कमी वेळात मनोगते व्यक्त केली. प्रमुख वक्त्यांना बोलण्याची संधी दिली. 7.मुख्य म्हणज...

*जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी आरावंदेकर, हेमंत पाटकर प्रथम*

*जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी आरावंदेकर, हेमंत पाटकर प्रथम* मालवण वार्ताहर - समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, बार्टी, बॅ. नाथ पै सेवांगण यांच्या वतीने बॅ. नाथ पै सेवांगण येथे आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटात श्रावणी आरावंदेकर तर खुल्या गटात हेमंत पाटकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.        स्पर्धेचा सविस्तर निकाल शालेय गट द्वितीय- दिक्षा वराडकर, तृतीय- सर्वेश मसुरकर, उत्तेजनार्थ - निधी सोनवडेकर, खुला गट द्वितीय सोनाली गोडे, तृतीय - अनुष्का कदम, उत्तेजनार्थ गुरुदास परब, विजेत्यांना रोख रक्कम तसेच प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बॅ. नाथ सेवांगणाचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, कोषाध्यक्ष शैलेश खंडाळकर, परीक्षक संजय शिंदे, संग्राम कासले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

*५ एप्रिल रोजी बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा*

मालवण - डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, बार्टी, बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या वतीने ५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे.    स्पर्धा गट पहिला -( सातवी ते बारावी), गट दुसरा - खुला गट अशा दोन गटात होणार आहे. गट पहिला (सातवी ते बारावी)- भारतीय संविधानातील मूलभूत हक्क व अधिकार तर गट दुसरा (खुला गट )-  भारतीय संविधानाची ७५ वर्ष असे विषय देण्यात आले आहेत. पहिल्या गटासाठी वेळ -सात मिनिटे तर दुसऱ्या गटासाठी वेळ - आठ मिनिटे देण्यात आली आहे.    पहिले गटातील विजेत्यांना १००० रुपये, ७०० रूपये, ५०० रुपये, तसेच प्रशस्तीपत्रक, तर खुल्या गटातील विजेत्यांना १५०० रुपये, १००० रुपये, ७०० रुपये तसेच प्रशस्तीपत्रक व उत्तेजनार्थ क्रमांक प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देण्यात येणार आहे.  संपर्क लक्ष्मीकांत खोबरेकर -9422946212 संग्राम कासले 9420824874

बखतीयार खान यांची एमडीआरटी पुरस्काराची हॅट्रिक

 मालवण - एलआयसी मालवण ब्रांचचे विमा प्रतिनिधी श्री बखत्तीयार खान यांनी 2024 -25 या वर्षांमध्ये सलग तीन वेळा हॅट्रिक करून एमडीआरटी होण्याचा पहिला मान मिळवला आहे. त्याबद्दल त्यांचा एलआयसी मालवणच्या ब्रांच मॅनेजर सतेजा बोवलेकर, विकास अधिकारी शैलेश पावसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी मिळवलेल्या  यशाबद्दल त्याचे अभिनंदन होत आहे. आज बखत्तीयार खान यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा!

*भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवणच्यावतीने संविधान दिंन साजरा*

 मालवण - भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवणच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कट्टा येथे 75 वा  संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष रविकांत कदम, तालुका संस्कार उपाध्यक्ष नचिकेत पवार, संस्कार सचिव मिलिंद पवार, योगेश वराडकर, प्रचार व पर्यटन सचिव संग्राम कासले, सचिन कासले, संरक्षण सचिव रमेश कदम, पौर्णिमा कासले इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्धांच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून व वंदना सूत्रपठण घेऊन करण्यात आली. तदनंतर  संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले. संग्राम कासले यांनी संविधानाविषयीची माहिती दिली तसेच तालुकाध्यक्ष रविकांत कदम यांनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमात प्रास्ताविकेचे वाचन नचिकेत पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन योगेश वराडकर यांनी केले.

तरुणांचा धम्म चळवळीत सहभाग

*तरुणांचा धम्म चळवळीत सहभाग*  मे व जून महिन्यात कट्टा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे बौद्धाचार्य श्रामनेर प्रशिक्षण शिबिर पार पडले. त्याची परीक्षा 27 ऑक्टोबर 2024 रोजी कणकवली येथे संपन्न झाली. या शिबिरात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थिमध्ये मी, सचिन कासले, मनोज काळसेकर 34 वयाच्या दरम्यान होतो. बाकी बहुतांश 50 वयाच्या पुढचे होते. एकूणच ही सर्व परिस्थिती पाहता तरुण धम्म चळवळीकडे मोठ्या प्रमाणात वळताना का दिसत नाही याचे विचार मंथन होणे गरजेचे आहे.           या संदर्भात मी टीव्हीवर नामदेव ढसाळ यांची एक मुलाखत पाहिली होती त्या मुलाखतीमध्ये ते म्हणतात की जे मूल बौद्ध परिवारात जन्मते त्यांना लहानपणापासूनच घरात तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो दिसतात. हे फोटो पाहूनच ही मुले लहानाची मोठी होतात. त्यामुळे ज्या महामानवांनी या देशात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूल्यांच्या प्रचार आणि प्रसाराचे कार्य केले. त्यांचे कार्य पुढे चालवणे ही त्या बौद्ध घरातील कुटुंबातील प्रत...

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत सावंतवाडीच्या निता सावंत प्रथम

  छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राज्यात सामाजिक न्याय दिन संमेलन सप्ताह साजरा होत आहे. यानिमित्त सामाजिक न्याय विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेत सावंतवाडीच्या नीता सावंत यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. द्वितीय क्रमांक सानिका वायंगणकर (मालवण) राजन जाधव (वेंगुर्ला) तर तृतीय क्रमांक संजय तांबे (कणकवली) अथर्व कोचरेकर (कणकवली) यांना विभागून देण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी एकूण 15 निबंध प्राप्त झाले होते. स्पर्धेचे परीक्षण डीएड कॉलेजचे प्रा. नागेश कदम यांनी केले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २ जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता श्री पुष्पसेन कॉलेज ऑफ फार्मसी ओरोस येथे संपन्न होणार आहे. तरी विजेत्या सर्व स्पर्धकांनी पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे व बार्टीचे प्रकल्प अधिकारी विजय कदम यांनी केले आहे.