मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

योजनेचे नाव - कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना

 महाराष्ट्र शासन सामाजिक व न्याय विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येते. या योजनेअतंर्गत अनूसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्रय़रेषेखालील भूमीहिन कुटुंबाना चार एकर जिरायती (कोरडवाहू) शेतजमिन किंवा दोन एकर बागायती (ओलीताखालील) शेतजमिन उपलब्ध करून देण्यात येते.  लाभार्थीचे निवडीचे निकष -  1. लाभार्थी हा अनुसुचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असावा.  2. लाभार्थी दारिद्रय़रेषेखालील भूमीहिन शेतमजूर असावा. 3. लाभार्थीचे वय किमान 18 वर्षे कमाल व 60 वर्षे असावे.  4. जमिन ज्या गावात उपलब्ध आहे त्याच गावचे रहिवासी अर्ज करण्यास पात्र असतील. 5. ज्या गावात जमिन उपलब्ध आहे त्या गावातील वरील अटी शर्तीमध्ये बसणारे लाभार्थी असे लाभार्थी न मिळाल्यास लगतच्या गावातील व लगतच्या गावातील लाभार्थी उपलब्ध न झाल्यास तालुक्यातील पात्र लाभार्थी याचा विचार करण्यात येईल.  6. महसूल विभगाने ज्याना गायरान व सिलिगच्या जमिनीचे वाटप केलेले आहे. त्या कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळणार नाहि.      लाभार्थी निवडीचा प्राधान्यक्रम  1. दारिद्र...

योजनेचे नाव - अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील बचतगटाना मिनीट्रॅक्टर/टॅक्ट्रर व शेती उपयोगी उपसाधने यांचा पुरवठा करणे

  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांतील बचतगटाना मिनी ट्रॅक्टर/ट्रॅक्टर व शेती उपयोगी उपसाधने बचतगटाचे उत्पन्न वाढावे या हेतूने देण्यात येत आहे. अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांतील बचतगटाना मिनी ट्रॅक्टर व शेतीउपयोगी उपसाधने यांचा पुरवठा करणे योजना राबविली जाते. सिंधुदुर्ग जिल्हय़ातील ज्या अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांतील बचतगटाना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे. अशा अनूसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील बचतगटानी कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सिंधुदुर्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन पोस्ट कार्यालयाचे समोर सिंधुदुर्गनगरी किंवा तालुक्यातील समतादूताशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण संतोष चिकणे यांनी केले आहे.  अर्जासोबत बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र, स्वयंसहायता गटातील 80 टक्के सदस्य हे अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांकातील असावेत व ते महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. बचतगटातील सदस्याची यादी व पूर्ण नाव पत्ता, जात, संपर्क मोबाईल क्रमांक, बचतगटातील मागासवर्गीय सदस्याचे जातीचे दाखले, रहिवासी दाखले, रेशनिग कार्ड, झे...

संजय पेंडुरकर - परिवर्तनवादी चळवळीतील अष्टपैलू व्यक्तिमत्व

भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवणचे कोषाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, कट्टा वराडकर हायस्कूल येथील सहाय्यक शिक्षक परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते संजयजी पेंडूरकर यांचा आज पन्नासावा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा! संजय पेंडुरकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. मालवण तालुक्यातील तरुण पिढी संजय पेंडुरकर यांच्या परिवर्तनवादी चळवळीतील कार्याने प्रभावित होऊन परिवर्तनवादी चळवळीत सहभागी झाली. मी लहानपणापासून संजय पेंडुरकर यांचे परिवर्तनवादी चळवळीतील कार्य पाहत आहेत. एखादा मुद्दा समोरच्या व्यक्तीला उदाहरणे, दाखले यासह पटवून देण्याचे कौशल्य संजय पेंडूरकर यांच्याकडे आहे. माणसे जोडण्याची कला संजय पेंडुरकर यांनी जपली आहे. त्यामुळेच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्षेत्रात त्यांचे नेटवर्किंग जबरदस्त आहे. संजय भांडवलकर यांचा आज पन्नासावा वाढदिवस आहे. परंतु संजय पेंडुरकर यांच्याकडे पाहिले असता ते अजूनही आम्हाला आमच्याच वयाचे वाटतात. यातूनच संजय पेंडुरकर यांची सर्व समावेशकता दिसून येते. संजय पेंडुरकर यांनी आपल्या पुढील काळात परिवर्तनवादी चळवळ अशीच जोमाने सुरू ठेवा...

शिष्यवृत्ती योजनेसाठी आवाहन

शैक्षणिक वर्ष 2022 - 23 यासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर, शिष्यवृत्ती मॅट्रिकोत्तर शिक्षण फी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजनेचे नवीन अर्ज व जुन्या अर्जाचे नूतनीकरण करण्याबाबत अनुसूचित जाती, इमाव, विजा, भज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे अधिक माहितीसाठी समाज कल्याण सिंधुदुर्ग (02362 - 228882) तसेच समतादुतांशी संपर्क साधावा. शामल सावंत कणकवली - 9420726374, राजू दिनदयाळ वैभववाडी- 9421235704, सगुण जाधव सावंतवाडी - 7066409995, सुदीप कांबळे देवगड - 9960803301,सुहास मोचेमाडकर दोडामार्ग- 8805269145,  सुजित जाधव वेंगुर्ला - 9422921882, विजय कदम कुडाळ - 9119570426, संग्राम कासले मालवण - 9420824874

भूविकास बँकेच्या कर्जदारासह कर्मचाऱ्यांनाही दिलासा

  राज्यातील भूविकास बँकांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना 964 कोटी 15 लाख रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय गुरुवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे तब्बल 69 हजार हेक्टरवरील जमीनीचा सात-बारा कोरा होणार आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणे सरकार देणार असल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माजी केंद्रीय मंत्री आनंद अडसूळ, कॅ. अभिजीत अडसूळ, भूविकास बँक कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष एम. पी. पाटील यांनी आभार मानले.

मी वाचलेला काव्यसंग्रह - अधांतर अंधारात (महेश केळूसकर)

गेले काही दिवस पुस्तकांचे वाचन केले नव्हते. परंतु काल संध्याकाळी कवी महेश केळुसकर यांचा अधांतर अंधारात हा काव्यसंग्रह वाचनात आला. त्यातील कविता वाचताना खरोखरच अंतर्मुख व्हायला झाले. सद्यस्थितीवर भाष्य करणाऱ्या महेश केळुसकर यांच्या कविता प्रत्येकालाच विचार करायला भाग पाडणाऱ्या आहेत. या काव्यसंग्रहातील काहीही न बोलता ही कविता देशातील सद्यस्थितीवर भाष्य करणारी आहे, तो माणूस तसा एकटा नाहीये. त्याच्यासारखे लाखो आहेत फाटके या देशात. काहीही न बोलता काय करायचं हे त्यांना माहित आहे सनातनपणे. या कवितेच्या शेवटच्या कडव्या मधून देशातील लोकांच्या स्थितीवर महेश केळुस्कर यांनी भाष्य केले आहे. बोलतच राहीन या कवितेच्या पहिल्या कडक्यातून जगण्याचे बळ मिळते, तुम्ही माझे हातपाय बांधा तोंडावर मुस्क्या बांधा तरीही मी बोलतच राहीन डोळ्यांनी... तुम्ही माझे डोळे फोडा तरी मी बोलतच राहीन भिंतीवर, जमिनीवर डोकं आपटत शिव्या देत राहीन तुम्हाला मनातल्या मनात मनापासून तळतळाट देत राहीन.  पुष्कळजन या कवितेतून माणसाच्या जीवनावर सोशलमीडियाचा किती प्रभाव पडला हे दिसून येते. आत्महत्या असो की निधन; लाईक करतात ल...

सौंदाळा मासळी खरेदी

आज मालवण समुद्रकिनारी लिलावाच्या ठिकाणी मासे खरेदी केले. समुद्रकिनारी सुरमई मासळी मोठया प्रमाणावर होती. पण बजेटनुसार सोंदाळा मासे खरेदी केले. https://youtu.be/Od4JNuE0u9w