मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सेवांगण उपक्रम समुह ग्रुप

सेवांगण उपक्रम समुह ग्रुप  काही दिवसांपूर्वी मी सेवांगण उपक्रम समुह ग्रुपशी जोडला गेलो. सेवांगण उपक्रम समूह या ग्रुपवरुन स्पर्धांचे निकाल बातमीसाठी उपलब्ध होतील हा माझा प्राथमिक हेतू होता. परंतु आज हा ग्रुप माझ्या ज्ञानात भर घालत आहे. त्याचबरोबरीने नवनवीन गोष्टी शिकायला लावत आहे. शालेय जीवनात मी बँ. नाथ पै सेवांगणच्या स्पर्धेत भाग घेतला होता. परंतु त्यावेळी मला सेवांगणच्या स्पर्धेत पारितोषिके मिळाले नव्हते. मात्र गेल्या काही दिवसात सेवांगण उपक्रम समूहातील दोन स्पर्धेत मी सहभागी झालो आणि त्यातील दोन स्पर्धेत मला पारितोषिके मिळाले. माझ्यासोबत बँ. नाथ पै सेवांगणच्या आँनलाईन स्पर्धेत अनेक जण सहभागी होत आहेत आणि पारितोषिके प्राप्त करीत आहेत. सेवांगण उपक्रम समूह हा ग्रुप लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींचा सर्वांचाच आवडता आहे. या ग्रुपच्या माध्यमातून लहान मुलांना छान छान कथा ऐकायला मिळतात. आता तर विज्ञानकथाही ऐकायला मिळणार आहेत. एकूणच कोरोना व लाँकडाऊन कालावधीतही लहान मुलांवर संस्कार करण्याचे काम, त्याबरोबरीने इतरांना कार्यप्रवण करण्याचे कार्य या ग्रुपच्या माध्यमातून केले जात आहे. ग्रुपमध्...

पप्पू.....

पप्पू.....  पप्पू माझा बीएडचा सहकारी. पप्पूचे मुळ नाव राजाराम पण तो सर्वत्र पप्पू याच नावाने प्रसिद्ध आहे. बीएडच्या पूर्ण वर्षात कोणताही तणाव न घेता बीएड योग्य पद्धतीने पूर्ण करणारा अवलिया कलाकार म्हणजे पप्पू. पप्पू कुडाळ हायस्कूलला शिक्षक म्हणून अध्यापनाचे कार्य करतो. पप्पू हा मित्रांमध्येच जास्त रमतो. किंबहुना त्याचा मित्रसाठा भरपूर आहे. अभ्यासाबरोबरच क्रिकेट हे पप्पूचे वेड. जिल्ह्यातील अनेक क्रिकेट सामने पाहण्यासाठी तो आवर्जुन उपस्थित असतो. बीएडला असताना सायंकाळी क्रिकेट खेळण्यासाठी तो मैदानावर आवर्जून उपस्थित असायचा. बीएडला असताना अनेक वेळा मैदानावर त्याने जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा आयोजन करण्याचा संकल्प केला होता. पप्पू हा जसा क्रिकेटवेडा आहे तसाच त्याला भटकंती करण्याचा छंद आहे. टु व्हिलर, फोर व्हीलरने तो जिल्ह्यात व जिल्ह्याच्या बाहेर भटकंती करत असतो. इतरांना मदत करणे हा पप्पूचा स्वभाव आहे. बीएडचा आमचा सहकारी रमेश भोये हा अपंग असल्याने त्याला पाठाला  जाताना अडचणी येत होत्या. ही बाब पप्पूच्या लक्षात येताच पप्पू आपल्या दुचाकीने त्याला पाठ असलेल्या शाळेत पोहचवायचा. पप्पूच...

वसतीगृह चळवळीचे प्रणेते...राजर्षी शाहू महाराज...

वसतीगृह चळवळीचे प्रणेते...राजर्षी शाहू महाराज... आज राज्यात व देशात शासनाकडून वसतीगृहे उभारण्यात आली आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासलेल्या जातींच्या मुलांसाठी ही वसतीगृहे कार्यरत आहेत.  लोकशाही व्यवस्थेत मिळालेल्या मिळालेल्या हक्क आणि अधिकारानुसार आज प्रत्येक जण शिक्षण घेत आहे. परंतु 20 व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत शिक्षण ही ठराविक लोकांची मक्तेदारी होती. शिक्षणाची कवाडे बहुजन समाजाला खुली व्हावीत यासाठी आयुष्यभर छत्रपती शाहू महाराजांनी प्रयत्न केले. तत्कालीन परिस्थितीत बहुजन समाजाच्या मुलांची शिक्षणासाठी परवड होत असे. ग्रामीण भागात शिक्षणाची सोय नसल्याने बहुजन समाजातील मुलांना शिक्षणासाठी शहरात यावे लागत असे. परंतु मोठ्या शहरात राहण्याची, जेवणाची त्यांची व्यवस्था होत नव्हती. ही बाब ध्यानात आल्यावर छत्रपती शाहू महाराजांनी 20 व्या शतकाच्या प्रारंभी म्हणजे 18 एप्रिल 1901 रोजी कोल्हापूर येथे व्हिक्टोरिया मराठा बोर्डींग स्कूल या कोल्हापूरातील पहिल्या वसतीगृहाची स्थापना केली. या बोर्डींग स्कूलच्या नावात मराठा असा उल्लेख असला तरी वसतिगृहात मराठ्यांप्रमाणे मुसलमान, शिंपी, कोळी, माळी, ग...

भूष.........

भूष......... पत्रकारिता, फोटोग्राफी, पेंटिंग, काव्यलेखन याचा कुठल्याही प्रकारचा वारसा नसताना मालवणमधील भूषण मेतर या उदयोन्मुख लेखक, कवी, पत्रकाराने अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. बालपणीच वडीलांचे छत्र हरवलेला भूषण हा संवेदनशील मनाचा आहे. त्याच्या कवितांमधून संवेदनशील मनाचे दर्शन घडते. भूषणच्या कविता या समाजातील सर्व घटकांचा वेध घेणाऱ्या आहेत. मैत्री, प्रेम, शाळा, पारंपरिक मच्छीमार, मत्स्यसंस्कृती, किनारपट्टीवर येणारी वादळे या सारख्या घटनांना भूषणने कवितेच्या माध्यमातून सर्वांपर्यंत मांडले आहे. भूषण हा उत्तम चित्रकार आहे. शालेय जीवनात त्याने असंख्य चित्रे रेखाटली आहेत. या चित्रांमध्ये त्याने समाजमनाचा वेध घेतलेला दिसतो. पत्रकारितेच्या निमित्ताने भूषण शहरी व ग्रामीण भागात सातत्याने भ्रमंती करत असतो. ही भ्रमंती करताना त्याने कँमेराने केलेले क्लिक अफलातून आहेत. मालवण राँक गार्डन, भंडारी हायस्कूल, टोपीवाला हायस्कूल, चिवला बीच, बंदरजेटी, मालवण किनारपट्टी ही भूषणने व्लिक केलेली छायाचित्रे सर्वांच्या पसंतीस उतरलेली आहेत. छायाचित्र, काव्यलेखन हा छंद जोपासताना पत्रकारितेच्या माध्यमातूनही सम...

दत्ता.....

दत्ता..... पुणे येथील समतादूत प्रकल्पाच्या ट्रेनिंगमध्ये माझी दत्ता गायकवाड या पुणे येथील मित्राशी ओळख झाली होती. मला वाटले होते ही ओळख ट्रेनिंग पुरतीच मर्यादित राहिल पण तसे घडले नाही समतादूत प्रकल्पाच्या निवडीत मला रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुका मिळाला होता. माझा ग्रामसेवक मित्र नितेश तांबे याने मला तळा येथील त्याचा मित्र ग्रामसेवक अतुल इंगळे याचा संपर्क नंबर दिला होता. त्यानुसार मी तळा येथे गेलो. एक रात्र अतुलकडे राहिलो. पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी पासून खोली शोधण्याची मोहिम हाती घेतली. खोलीसाठी शोधमोहीम राबवताना लक्षात आले की दत्ता तळा तालुक्यात राहतो. मी दत्ताची भेट घेतली आणि खोली शेअर करण्याविषयी विचारले. दत्ताने लागलीच होकार दिला आणि आम्ही तळा येथे एकत्र राहू लागलो. अकरा महिने मी आणि दत्ता तळा येथे राहिलो. या कालावधीत दत्ताकडून बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. दत्ता हा उत्तम फोटोग्राफर आहे. पुणे जुन्नर येथे त्याने काही काळ फोटोग्राफी केली. याच दरम्यान तो स्पर्धा परिक्षेचाही अभ्यास करायचा. तळा येथेही दत्ताने स्पर्धा परीक्षेची भरपूर पुस्तके आणली होती. दत्तामुळे मला देखील स्पर्धा परीक्षेची...

मालवण प. स.चे विद्यालय अँप

मालवण प. स.चे विद्यालय अँप कोरोना कालावधीत लाँकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना तीन महिने घरीच रहावे लागले आहे. अशा परिस्थितीत शाळा कधी सुरु होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु सोमवारी शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. रेडझोनमध्ये असणाऱ्या शाळा सद्यस्थितीत बंद राहणार असून विद्यार्थ्यांची आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळजी घेऊन शाळा सुरु होणार आहेत. परंतु या कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आँनलाईन शिक्षणाचा देखील एक पर्याय असणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी मालवण पंचायत समितीच्या टिमने विद्यालय हे अँप विकसित केले आहे. मालवण पं.स.चे गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, सर्व प.स.सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रस्नेही शिक्षकांच्या टिमने विद्यालय अँप विकसित केले आहे. या अँपचे उद्घाटन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तिसरी ते सातवी पर्यंतचा इयत्तावार अभ्यासक्रम या अँपमध्ये सामाविष्ट करण्यात आला आहे. अभ्यासक्रमातील पाठांच्या स्मार्ट पीडीएफ बनविण्...

अनटोल्ड स्टोरी.......

अनटोल्ड स्टोरी....... टीव्ही वाहिन्यांवरुन सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केल्याचे वृत्त प्रसारित झाले. या घटनेने सुशांतसिंग राजपूतच्या अनेक फँनला धक्का बसला. पवित्र रिश्ता या सिरीअलमधील मानव या व्यक्तीरेखेमुळे सुशांत अनेकांच्या मनात घर केले होते. त्यानंतर त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. काय पो चे पासून त्याचा हिंदी चित्रपटसुष्टीचा अभिनय प्रवास सुरु झाला. प्रत्येक चित्रपटात सुशांतने अभिनयाचे वेगळेपण जपले होते. त्याचा प्रत्येक चित्रपटातील अमिनय नाविन्यपूर्ण असायचा. शुद्ध देसी रोमान्स, केदारनाथ, छिछोरे या चित्रपटाने सुशांत तरुणाईच्या गळ्यातील बनला होता. त्याचे सर्व चित्रपट अप्रतिम होते. परंतु मला त्याचा एम.एस.धोनी अनटोल्ड हा चित्रपट खूप आवडतो. हा चित्रपट किती वेळा पाहिला तरी कंटाळा येत नाही. एम. एस. धोनी या चित्रपटात सुशांतसिंगने धोनीची भूमिका अप्रतिम साकारली. या चित्रपटासाठी सुशांतसिंगने भरपूर मेहनत घेतली होती. चित्रपटात सुशांतसिंग जणू महेंद्रसिंग धोनीच भासत होता. चित्रपटात सुशांतसिंगने साकारलेले प्रत्येक प्रसंग स्ट्रगल करणाऱ्या तरुणाईसाठी प्रेरणादायक वाटतात. चित्रपटात एके ठिका...