मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

भंडारी हायस्कूल

 भंडारी हायस्कूलमध्ये मी तिसऱ्या इयत्तेत प्रवेश घेतला. तिसरी ते बारावी पर्यंतचे माझे शिक्षण भंडारी हायस्कूलमध्ये झाले. या दहा वर्षात मला व माझ्या असंख्य मित्रांना भंडारी हायस्कूलने बरच काही दिल आहे. म्हणूनच आम्ही अभिमानाने भंडारी हायस्कूलचे विद्यार्थी असे सांगतो. भंडारी हायस्कूलने मला आयुष्यभर साथ देणारे असंख्य मित्र मैत्रीण दिल्या. हा मित्र मैत्रीणींचा ग्रुप एवढा प्रचंड आहे की त्याची यादी तयार करण्यासाठी एक स्वतंत्र ब्लाँग तयार करावा लागेल. मी किंवा माझे मित्र, मैत्रीण अडचणीत असू हा ग्रुप आमच्या मदतीला नेहमीच तयार असतो. भंडारी हायस्कूलने आम्हाला जीवनाचे महत्व शिकवणारे अनेक शिक्षक दिले. यामधील अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत तर काही शिक्षक आजही कार्यरत आहे. भंडारी हायस्कूलमधील सर्व शिक्षक, शिक्षिका कडक शिस्तीचे होते पण तेवढेच प्रेमळ होते. या शिक्षकांनी आम्हाला अभ्यास तर शिकवला पण त्याचबरोबरीने आमच्यातील कलागुणांनाही वाव दिला. भंडारी हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलन, क्रिडा स्पर्धा, प्रजासत्ताकदिनी बोर्डींग ग्राऊंड, टोपीवाला हायस्कूल मैदानावर होणारे कार्यक्रम हा माझा व माझ्यासह असंख्य मि...

माझा वाचन प्रवास

वाचाल तर वाचाल असे एक सुवचन आहे. या सुवचनाने मला लहानपणापासून प्रेरित केले. पहिली ते पाचवी या कालावधीत मी जास्तकरुन गोष्टींची पुस्तके वाचली. सहावीपासून मी भंडारी हायस्कूलच्या ग्रंथालयात जाऊ लागलो. ग्रंथालयात मला वेगवेगळ्या विषयावरची पुस्तके वाचायला मिळाली. सहावी ते दहावी या कालावधीत मी एकांकिका, पर्यावरण, विज्ञान या विषयावरची पुस्तके वाचली. अकरावी व बारावीत मी अनेक महनीय व्यक्तींची चरित्रे अभ्यासली. त्याचबरोबर ऐतिहासिक विषयांवरील पुस्तकांचा अभ्यास केला. दोन वर्षात मी मृत्युंजय, राधेय, कौंतेय, राजा शिवछत्रपती, शुद्र पूर्वी कोण होते? आदि पुस्तके वाचली. या कालावधीत मी लोकमत या वृत्तपत्राचे सातत्याने वाचन करायचो. या वृत्तपत्रातील स्पर्धा परीक्षेसाठीची कात्रणे गोळा करुन मी त्याची एक वही बनवली होती. स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर काही दिवसातच मी दै. रत्नागिरी टाईम्स या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम करू लागलो. काँलेजच्या तीन वर्षांत माझे दैनंदिन वृत्तपत्रांचे वाचन वाढले. पण मी जिल्ह्यातील वृत्तपत्रे वाचन करत होतो. वृत्तपत्र वाचनाबरोबर अनेक मराठी कादंबऱ्यांचेही मी वाचन...

हि दोस्ती तुटायची नाय.......

निखिल गावकर आणि माझी मैत्री तिसरीपासूनची. भंडारी हायस्कुलमध्ये तिसरी ते दहावी या कालावधीत आम्ही एकत्र शिकलो. हायस्कूलमध्ये आम्ही माँनिटर, उपमाँनिटर जबाबदारी सांभाळयचो. त्यामुळे सात वर्षात आमची नावे कधीही फळ्यावर आली नाहीत.( वर्गात मस्ती करणाऱ्यांची नावे फळ्यावर लिहली जात). निखिल हा मच्छीमार कुटुंबातून आलेला आहे. परंतु निखिल शिक्षणाचे महत्व जाणून होता. म्हणून दहावीनंतर त्याने सायन्स करुन इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने अनेक ठिकाणी जाँब केले. अखेर त्याने घेतलेल्या परिश्रमाला फळ मिळाले आणि तो लघुपाटबंधारे विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाला. निखिल हा सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला मुलगा आहे. त्यामुळे शासकीय नोकरीत रुजू होण्यापर्यंत त्याला अनेक संकटांनाचा सामना करावा लागला. पण सर्व संकटाचा सामना करुन निखिलने आपले ध्येय्य प्राप्त केले. मित्रांच्या मदतीला धावून जाणे हा निखिलचा स्थायीभाव आहे. आमच्या बँचने व्हाँट्सअपवर माजी विद्यार्थ्यांचा ग्रुप बनवला आहे. त्यामध्ये निखिलनेही पुढाकार घेत अनेक माजी विद्यार्थ्यांना ग्रुपमध्ये अँड केले. या ग्रुपच्या म...

ब्रँव्हो कमलेश.....

 काही दिवसापूर्वी ओरोस येथे पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेल्या कमलेश सोनावणे या मित्राची फेसबुकवर एक पोस्ट आली. घरपण द्या माझ्या घरा या अल्बममध्ये कमलेशने अभिनय केल्याची ती पोस्ट होती. त्या पोस्टखालीच कमलेशने लवकरच सरप्राईज असे लिहिले होते. त्याच्या दोन दिवसानंतर कमलेशने मला गणरायाची स्वारी या अल्बमची युट्यबची लिंक शेअर केली. त्या व्हिडीओत कमलेश अफलातून नृत्य सादर करताना दिसला. क्षणभर मला प्रश्न पडला की कमलेश नक्की काय करतो? कमलेशचे अभिनंदन करण्यासाठी मी कमलेशला फोन केला. त्यावेळी कमलेशसोबत भरभरून बोललो. फोनवर बोलताना कमलेशच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलु उलघडत गेले. कमलेशच्या व्यक्तीमत्त्वाचे पैलु सर्वांसमोर येणे गरजेचे आहे. त्यासाठीच आजचा ब्लॉग लिहिण्याचा प्रपंच. कमलेश व निलेश या दोघेही भावांचे शिक्षण मालवणच्या भंडारी हायस्कूलमध्ये झाले. त्यांचे वडील त्यावेळी मालवण पोलीस ठाण्याला पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत होते. बालवाडी ते सातवीपर्यंत कमलेश व निलेश भंडारी हायस्कूला होते. पाचवीत असताना आम्ही जिस देश मै गंगा रहता है या गाण्यावर नृत्य केले होते. त्यामध्ये कमलेश व निलेशने सुंदर नृत्...

अर्थशास्त्राची आवड निर्माण करणारे बांदेकर सर!

अकरावी बारावी ही दोन वर्षे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानतो. कारण अकरावीत माल अनेकांनी सायन्स घे असे सांगूनही मी स्वत:च्या निर्णयावर ठाम राहून आर्टस निवडले होते. दोन वर्षे मी भंडारी हायस्कूल ज्युनियर कॉलेज येथे तत्कालीन मुख्याध्यापक प्रा. वाय. आर. राजूरकर, प्रा. ए. व्ही. देसाई, सौ. समिता मुणगेकर मॅडम, परूळेकर सर, सौ. प्रभु मॅडम या मार्गदर्शक शिक्षक व प्राध्यापकांच्या सानिध्यात घालविली. या प्राध्यपकांपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे प्रा. रूपेश बांदेकर सर. बांदेकर सर आम्हाला अकरावी बारावीला अर्थशास्त्र शिकवायचे. सरांमुळेच मला अर्थशास्त्राची आवड मला निर्माण झाली. बहुतांश अर्थशास्त्रज्ञांची नावे सरांच्या तोंडपाठ आहेत. अर्थशास्त्र अनेक सिद्धांत बांदेकर सरांनी सोप्या भाषेत करून सांगतिले. हे मीच नाही तर माझ्या बॅचचे अनेकजण सांगतील. म्हणूनच काय घटत्या उपयोतितेचा सिद्धांत आणि त्यावर सरांनी दिलेले लाडूचे उदाहरण आजही स्मरणात आहे आणि दिर्घकाळ स्मरणात राहिल. सर छोट्या छोट्या गोष्टीतून आम्हाला अर्थशास्त्र शिकवयाचे उदा. आम्हाला बारावीचा ट्रीपला जायचे होते. पण एकदम पैशाची साये होणे कठीण होते. म्हणून ब...

अंबाडा.........

                                                                   अंबाडा......... लाँकडाऊन कालावधीत बाजारात भरपूर प्रमाणात आंबाडे आले होते. मी उत्सुकता म्हणून आंबाड्यांची खरेदी केली. एक शेर पन्नास रुपये प्रमाणे मला बाजारात आंबाडे उपलब्ध झाले. घरी आणल्यावर आईने आंबाडे खारात घातले. साधारण पंधरा दिवसानंतर मी त्यातल्या एका आंबाड्याचा आस्वाद घेतला. अप्रतिम, स्वादपूर्ण असा आंबाडा होता. त्यानंतर मी आणखी दोन वेळा आंबाडे खरेदी करुन आणले आणि खारात घातले. आंबाडा या फळाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी मी इंटरनेटवर शोधमोहीम राबवली. त्यातून मला खूपच इंटरेस्टिंग माहिती उपलब्ध झाली. याच माहितीच्या अनुशंगाने मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. आंबाड्याचे शास्त्रीय नाव Spondias pinnata ( स्पाँडियस पिंनाटा) असे संबोधले जाते. अंबाडा हा कँश्यू या प्रवर्गात मोडतो. ग्रीक भाषेत अंबाड्याला स्पाँडियस असे संबोधतात. जगात आंबाडा हा वाईल्ड मँगो किंवा रानटी आ...

मै पल दो पल का शायर हू!

                                                      मै पल दो पल का शायर हू!  15 ऑगस्ट रोजी सायंकाळी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे सोशल मिडीयावर पोस्ट करून जाहिर केले. धोनीने मै पल दो पल का शायर हूँ! या गीताच्या साथीने निवृत्तीची पोस्ट शेअर केली. धोनीची क्रिकेट कारकिर्द प्रत्येकासाठी प्रेरणादायक आहे. रांची या गावातून आलेल्या धोनीने संपूर्ण जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली. 2007 टी 20 वल्ड कप, 2011 चा 50 षटकांचा वल्ड कप, 2013 ची चॅम्पियन ट्रॉफी आदि विजेतेपद भारताने धोनीच्या नेतृत्त्वाखाली प्राप्त केली आहेत. शांत, संयमी धोनी भारतीय संघासाठी मार्गदर्शक राहिला आहे. स्टँपच्या पाठीमागे उभा राहून संपूर्ण सामन्याची सूत्रे फिरवणारा धोनी क्रिडा रसिकांच्या कायम लक्षात राहणार आहे. 2004 मध्ये आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदापर्ण करणाऱ्या धोनीने हेअर स्टाईलने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. धोनीचा हॅलिकॉप...